News

स्मॅट: सूर्या आणि मुंबई विजयी!

By Mumbai Indians

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२४ ने पलटनला ब्लू अँड गोल्डमधले आपले खेळाडू, विशेषतः नवीन चेहरे खेळाच्या सर्वांत लहान स्वरूपात काय करू शकतात याची झलक दाखवली. ही झलक अगदीच तगडी ठरली.

ग्रुप टप्प्यात अत्यंत अटीतटीचे सामने झाले. आपले चार खेळाडू हार्दिक पांड्या (बडोदा), सूर्यकुमार यादव (मुंबई), राज बावा (चंदीगढ) आणि सत्यनारायण राजू (आंध्र प्रदेश) उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले.

… आणि मग सूर्यकुमार यादवने मुंबईसोबत स्मॅटमध्ये दुसरा विजय नोंदवला आणि अंतिम सामन्यात मध्य प्रदेशवर पाच विकेट्सनी विजय मिळवला.

चला तर मग बघूया स्पर्धेच्या शेवटच्या टप्प्यात उपउपांत्य फेरी कशी पार पडली ते.

प्राथमिक उपउपांत्य फेरी | ९ डिसेंबर

चंदीगढचा राज बावा आणि आंध्र प्रदेशचा सत्यनारायण राजू यांनी बंगाल आणि उत्तर प्रदेशवर हल्ला करून उपउपांत्य फेरीत प्रवेश मिळवण्याचा प्रयत्न केला.

दुर्दैवाने आपले दोन्ही तरूण खेळाडू अपयशी ठरले. परंतु त्यांनी मोठा लढा दिला. आपला अष्टपैलू बावा याने चार ओव्हर्समध्ये २/२७ विकेट्स घेतल्या आणि नंतर २० चेंडूंमध्ये ३२ धावा केल्या तर सत्यनारायण राजू याने आपल्या टीमसाठी १/३० विकेट्स घेतल्या.

चंदीगढला बंगालविरूद्ध तीन धावांनी निसटता पराभव पत्करावा लागला. आंध्र प्रदेशने उत्तर प्रदेशविरूद्ध चार विकेट्सने पराभव स्वीकारला. त्यांचा प्रवास इथेच थांबला.

उपउपांत्य फेरी | ११ डिसेंबर

आपले दोन महान खेळाडू- मुंबईचा सूर्या आणि बडोद्याचा एचपी हे दोघे शेवटच्या ८ खेळाडूंमध्ये होते.

कुंग फू पांड्याने बडोद्याच्या बंगालवरील ४१ धावांच्या विजयात ३/२७ चे योगदान दिले.

परंतु आमच्या मिस्टर ३६० डिग्रीसाठी आजचा दिवस वाईट होता. मात्र मुंबईचा विजय झाला. २०२२ च्या चॅम्पियन्सनी भरपूर धावा झालेल्या या सामन्यात विदर्भावर सहा विकेट्सनी विजय प्राप्त केला.

उपांत्य सामना | १३ डिसेंबर

एक नंबर! उपांत्य सामन्यात बडोदा विरूद्ध मुंबई म्हणजे एचपी आणि स्काय अंतिम सामन्यात एकत्र खेळणार.

या मनोरंजक सामन्यात मुंबईचा सहा विकेट्सनी विजय झाला. त्यांनी या स्पर्धेच्या इतिहासात दुसऱ्या वेळी अंतिम सामन्यात जागा मिळवली. त्यांनी या अंतिम सामन्यात मध्य प्रदेशविरूद्ध खेळ केला.

अंतिम सामना| १५ डिसेंबर | सूर्यकुमार यादवचा विजय असो!!!!

सूर्यादादाने आपला खेळ मध्य प्रदेशविरूद्धच्या लढ्यासाठी वाचवून ठेवला होता असे म्हणायला हरकत नाही.

आधी गोलंदाजीचा निर्णय घेतलेल्या स्कायने सर्वोत्तम कामगिरी केली. त्याने तीन कॅचेस घेऊन आपल्या टीमला प्रतिस्पर्धी संघाच्या पहिल्या फळीला गारद करायला मदत केली.

१७५ धावांचा पाठलाग करताना या उजव्या हाताने खेळणाऱ्या फलंदाजाने ३५ चेंडूंमध्ये ४८ धावा कुटल्या. त्याने चार चौकार आणि तीन षटकार मारले. यशस्वी पाठलागासाठी या धावा खूप उपयुक्त ठरल्या.