एमआयचा ‘कराटे किड’ गेराल्ड कोत्झीचा उदय
त्याचा हेडबँड, त्याचे धावणे, त्याचा वेग, आक्रमकता, आनंद साजरा करण्याची पद्धत, त्याच्या मानेतून उसळणारी त्याची नस हे सगळे आपल्याला पाहायला मिळणार आहे. आम्ही सगळे २२ मार्चची आतुरतेने वाट बघत आहोत. २०२३ मध्ये क्रिकेट जगतात खळभल निर्माण केल्यानंतर गेराल्ड कोत्झी आता ब्लू अँड गोल्डमध्ये एक इतिहास रचण्यासाठी सज्ज आहे.
त्याचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू बनण्याचा प्रवास त्याच्या मैदानावरील धमाक्यासारखाच होता- वेगवान, डायनॅमिक आणि त्याच्या या टॅलेंटकडे कुणीही दुर्लक्ष करावे असे नव्हते.
“मी सर्व प्रकारचे दक्षिण आफ्रिकन खेळ खेळत मोठा झालो. माझा भाऊ आणि मला स्पर्धात्मक खेळ खेळायला खूप आवडायचे. आमच्या घराच्या अंगणात आम्ही रग्बी, टेनिस आणि क्रिकेट खेळायचो. आम्ही पोहायचोसुद्धा. आम्हाला मैदानात खेळायला, स्पर्धा करायला आवडायचे. आम्हाला क्रिकेट जास्त चांगले खेळता यायचे. आम्ही तर त्याच्या प्रेमातच पडलो,” कोत्झीने रेव्हस्पोर्ट्झला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
चेकपॉइंट १: कोत्झीकडून त्याच्या आगमनाची घोषणा
सर्व वयोगटात क्रिकेट खेळत असल्यापासून त्याने आपण चेंडूबाँब टाकत असल्याची प्रतिमा निर्माण केली आहे. त्यानंतर हा ताशी १४० किलोमीटरपेक्षा जास्त वेगाने गोलंदाजी करणारा दक्षिण आफ्रिकन राजधानी ब्लोमफोन्टेनमधला खेळाडू लवकरच प्रोटीआजच्या अंडर १९ संघाचा भाग बनला.
२०१८ मध्ये जगाला अंडर-१९ विश्वचषकामुळे या कराटे किडला पाहता आले. कोत्झीने चार सामन्यांमध्ये आठ विकेट्स घेऊन दक्षिण आफ्रिकेसाठीचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडू ठरला. त्याने सलग पाच विकेट्सदेखील घेतल्या (न्यूझीलंडविरूद्ध ५/३२). त्याच्या या उत्तम कामगिरीमुळे त्याला फर्स्ट क्लास क्रिकेटमध्येदेखील संधी मिळाली.
चेकपॉइंट २: देशांतर्गत सामने
वयाच्या १७ व्या वर्षी म्हणजे २०१९ मध्ये तो नाइट्ससोबत खेळू लागला आणि आपल्या पहिल्याच सामन्यात ४/५३ अशी कामगिरी केली (नाइट्स विरूद्ध वॉरियर्स, १ मार्च, सीएसए ४ दिवसांची मालिका.) कोत्झीने संपूर्ण सीझनमध्ये हाच फॉर्म ठेवला आणि २४.७ च्या सरासरीने चार सामन्यात १७ विकेट्स घेऊन नाइट्स प्लेयर ऑफ दि सीझन पुरस्कार पटकावला. त्याने म्झांसी सुपर लीगमध्ये जोझी स्टार्ससोबत आपला पहिला टी२० अनुभवदेखील घेतला. या प्रोटीआजच्या खेळाडूसाठी २०२० आणि २०२१ ही वर्षे अशीच गेली. त्याने यू-१९ विश्वचषक दुसऱ्यांदा खेळला आणि आयपीएल कार्निव्हलचा पहिला अनुभव घेतला. तो राजस्थान रॉयल्समध्ये लियम लिव्हिंग्स्टनच्या बदली खेळायला आला.
चेकपॉइंट ३: वेलकम कोत्झी, इंटरनॅशनल क्रिकेटर
२०२२ मध्ये सीनियर प्रोफेशनल क्रिकेटचे दरवाजे त्याच्यासाठी उघडले. त्याला दक्षिण आफ्रिकेच्या इंग्लंड आणि आयर्लंडच्या दौऱ्यावर बोलवण्यात आले. त्यानंतर तो प्रोटीआजच्या २०२२ टी२० विश्वचषक संघाचा भाग झाला.
त्याला प्रतीक्षा करावी लागली. परंतु फेब्रुवारी महिन्यात त्याच्यासाठी आनंदाचा दिवस उगवला. या स्पीड मशीनला फेब्रुवारी २०२३ मध्ये वेस्ट इंडिजविरूद्ध पहिल्या कसोटी सामन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेचे आपण प्रतिनिधित्व करत आहोत हे सांगण्याची संधी मिळाली.
“२०१८ च्या विश्वचषकामध्येदेखील माझ्या मते तो एक अप्रतिम खेळाडू होता. तो तिथेच राहिला तर कधी ना कधी तरी दक्षिण आफ्रिकेसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू शकेल अशी मला खात्री होती," असे मत महान खेळाडू इयान बिशप याने ईएसपीएनक्रिकइन्फोला दिलेल्या पॉडकास्टमध्ये व्यक्त केले होते.
त्यानंतर मार्च आणि ऑगस्ट २०२३ मध्ये ओडीआय (वेस्ट इंडिजविरूद्ध) आणि टी२०आय कॅप्सदेखील (ऑस्ट्रेलियाविरूद्ध) त्याच्यासाठी आल्या.
चेकपॉइंट ४: विक्रम मोडीत काढणारा ओडीआय विश्वचषक
एन्रिच नॉर्टजे किंवा सिसांदा मगला दुखापतग्रत्स होऊन बाद झाल्यानंतर दक्षिण आफ्रिकेला आयसीसी क्रिकेट विश्वचषक २०२३ मध्ये प्रतिस्पर्धी टीम्ससाठी अडचण निर्माण करण्यासाठी गेराल्ड कोत्झीवर भिस्त ठेवावी लागली. त्याने जो काही खेळ केलाय त्याला तोड नाही. त्याने पाच सामन्यांमध्य ११ आणि ४० ओव्हर्सदरम्यान दहा विकेट्स घेतल्या.
त्याने क्रिकेट विश्वचषकात मधल्या ओव्हर्समध्ये राज्य केले. त्याने त्या टप्प्यात आपल्या विक्रमी २० विकेट्सपैकी १५ विकेट्स घेतल्या. आठ सामन्यांमधल्या २० विकेट्सच्या कामगिरीमुळे तो ही कामगिरी करणारा विश्वचषकाच्या इतिहासातील पहिला प्रोटीआज गोलंदाज ठरला. त्याने मॉर्न मोर्कल आणि लान्स क्लसनरच्या १७ विकेट्सच्या आधीच्या विक्रमाला मागे टाकले. त्याने २०२३ या वर्षात सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये २१ सामन्यांत ४७ विकेट्स घेऊन प्रत्येक प्रथम खेळणाऱ्या खेळाडूला स्वप्न दाखवले आहे.
चेकपॉइंट ५: आयपीएल लिलाव आणि फॅ-एमआय-ली मध्ये स्वागत
कोत्झीने ओडीआय विश्वचषकात चांगलाच धुमाकूळ घातला. त्यामुळे आयपीएल २०२४ मिनी लिलावात तो एक दिग्गज खेळाडू म्हणून सामील झाला. क्रिकेट चाहते तर उत्साहात होतेच पण या प्रोटीआजच्या स्टारचे तारेदेखील चमकत होते.
“आयपीएल लिलाव खूपच उत्कंठावर्धक असतो. लिलावात सहभागी होणाऱ्या प्रत्येक क्रिकेटपटूसाठी काय होऊ शकेल याचा प्रत्येक जण अंदाज बांधत असतो. मला काय होईल याची फारशी काळजी नाही. काहीही होऊ शकते. मी कुठे असेन हे मला माहीत नाही परंतु त्याची चिंता करणार नाही. मला काही मेसेजेस किंवा कॉल्स आले तर शांत राहीन आणि काय होते ते पाहीन. पण मी वाट पाहणार नाही,” तो म्हणाला.
मग लिलावात तर मस्तपैकी चढाओढ झाल्यानंतर कोत्झीला मुंबई इंडियन्सने आपल्याकडे घेतले. क्या बात है! आपल्या मिनी लिलावातल्या पहिल्या खरेदीला फॅ-एमआय-मध्ये येऊन खूप आनंदही झाला.
“मला मुंबई इंडियन्सने घेतल्याबद्दल खूप आनंद झाला आहे. मी वानखेडेवर धावण्यासाठी, चाहत्यांची गाणी आणि जल्लोष ऐकण्यासाठी हार्दिक (पंड्या)च्या हाताखाली खेळण्यासाठी आणि बुमरासोबत गोलंदाजी करायला खूप उत्सुक आहे. सर्व चाहत्यांसाठी, मी गर्दीत तुमचे चेहरे आणि झेंडे पाहायला फार आतूर आहे.”
आम्हीसुद्धा वानखेडेवर स्टंप्स इकडेतिकडे उडताना पाहायला खूप आतूर आहोत!