लक्ष्य रणजी ट्रॉफी जिंकण्याचे आहेः कुमार कार्तिकेय सिंग
सध्या कुमार कार्तिकेय सिंग प्रचंड फॉर्ममध्ये आहे.
कार्तिकेयच्या चपखल बदलांमुळे टाटा आयपीएलच्या या सीझनमध्ये विकेट्स काढल्यानंतर कार्तिकेयने मध्य प्रदेशच्या त्याच्या टीमसोबत लाल बॉल फॉर्मॅटवर लक्ष वळवले आहे.
पंजाबविरूद्धच्या उपउपांत्य फेरीत कार्तिकेयने दुसऱ्या इनिंगमध्ये सहा विकेट्स घेतल्या आणि एमपीला उपांत्य फेरीत पोहोचवले. परंतु त्याला इइथेच थांबायचे नाहीये.
“या टीमला उपांत्य फेरीत पोहोचवल्याबद्दल मला खूप आनंद वाटतो. आमचे लक्ष्य सतत चांगली कामगिरी करण्याचे आहे. आम्ही फक्त सेमी फायनल्सपर्यंत पोहोचण्याचा आनंद साजरा करू इच्छित नाही. आम्ही यासाठी कठीण मेहनत करायची तयारी ठेवली आहे आणि मला खात्री आहे की आमच्याकडे पुढचे दोन सामने जिंकण्याची क्षमता आहे. फक्त मोठमोठी नावे तुम्हाला सामने जिंकून देऊ शकत नाहीत. विजयासाठी चांगली कामगिरी करायची गरज आहे. या क्षणी आम्ही हेच करत आहोत,” कार्तिकेयने ईएसपीए क्रिकइन्फोला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
आमचा हा स्पिनर एमपीचा प्रमुख मार्गदर्शक आणि भारताचा पूर्वीचा विकेट कीपर फलंदाज चंद्रकांत पंडित यांना क्षेय देतो.
“कोणत्या लाइन्स आणि लांबींवर काम करायचे आणि कोणत्या कोनांचा वापर करायचा याबाबत त्यांनी मला मार्गदर्शन केले. दुसऱ्या इनिंगमध्ये पिच जरा जास्तच वळणे घेत होती. त्यामुळे फलंदाजांना जास्त बचावात्मक खेळावे लागत होते. त्याचा फायदा मला झाला. मी माझा कोन थोडासा बदलला आणि कोनावर धावण्याऐवजी सरळ चेंडू टाकून विकेट मिळवल्या. मला एका ठराविक टप्प्यावर बॉल टाकता येत होता. त्यामुळे मला विकेट्स मिळाल्या,” असे तो म्हणाला.
स्पर्धकांमध्ये शुभमन गिल आणि मनदीप सिंग यांच्यासारखी मोठी नावे असल्याबाबत कार्तिकेयला काळजी वाटली नाही.
“मी प्रतिस्पर्ध्यांमध्ये असलेल्या मोठ्या नावांचा विचार करत नाही. मी फक्त माझ्या प्रक्रिया आणि नियोजनानुसार काम करतो. तुम्ही सातत्यपूर्णतेने गोलंदाजी करत असता तेव्हा गोष्टी बदलू शकतात. शिवाय दररोजचा दिवस फलंदाजांचा दिवस असतोच असे नाही. तो माझ्यासाठी असाच एक दिवस होता,” तो म्हणाला.
कार्तिकेयच्या जादूमुळे एमपीला सहजपणे १० विकेट्सवर विजय मिळवता आला. परंतु आपला स्पिनर अजूनही हवेत नाही कारण काही गोष्टींमध्ये सुधारणा करणे गरजेचे आहे हे त्याला माहीत आहे.
“सुधारणेसाठी कायम संधी उपलब्ध असतात. आमची या मॅचमधली बॅटिंग आणि बॉलिंग चांगली होती. पण आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की आपण सोपे कॅच सोडले आणि विशेषतः पहिल्या इनिंगमध्ये. आमची सामन्यानंतर टीम मीटिंग झाली आणि चंदू सरांनी याच गोष्टीवर भर दिला. तुम्ही जिंकता तेव्हा केलेल्या चांगल्या गोष्टी दिसून येतात. पण चुका फक्त एकट्याला दिसतात. या गोष्टींवर आम्हाला तात्काळ काम करायची गरज आहे,” कार्तिकेय म्हणाला.
आम्ही कार्तिकेय आणि मध्य प्रदेश टीमला शुभेच्छा देतो. ते रणजी ट्रॉफीच्या १४ जून रोजी सुरू होणाऱ्या उपांत्य फेरीत पश्चिम बंगालचा सामना करणार आहेत.