News

सेट झाल्यावर मला एक मोठा स्कोअर उभा करायचा आहेः ईशान किशन

By Mumbai Indians

विकेटकीपर, फलंदाज ईशान किशनने प्रसारमाध्यमांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. त्याने चेन्नई सुपरकिंग्सविरूद्ध आमच्या ब्लॉकबस्टर क्लॅशपूर्वी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. 

या तरूण ओपनरने या सीझनमधील त्याच्या मिश्र फॉर्मबद्दल, त्याला ज्येष्ठ खेळाडूंकडून मिळालेल्या सल्ल्याबद्दल आणि तो आमचा कर्णधार रोहित शर्माला फील्डवर कशा प्रकारे मदत करतो अशा विविध गोष्टींवर चर्चा केली. 

त्याने सुरूवातीच्या दोन सामन्यांत सलग अर्धशतके काढल्यानंतर कमी स्कोअर्सचा सामना कसा केला याबद्दल विचारण्यात आल्यानंतर पॉकेट डायनॅमोने बऱ्याच काळापासून सराव करत असलेल्या रूटीनचे पालन करणे महत्त्वाचे होते असे मत व्यक्त केले. 

“चढउतार हे खेळात होतच असतात. सामन्यांमध्ये कार्यपद्धती योग्य ठेवणे महत्त्वाचे असते. आम्ही आमच्या खेळावर आणि आम्ही कशा प्रकारे सुधारणा करून शकतो यावर लक्ष केंद्रित करतो,” ईशान म्हणाला.

ईशानसोबत ओपनिंगला जाणारा कर्णधार रो आणि मुख्य मार्गदर्शक महेला जयवर्धने यांच्याशी चर्चा करून त्याला थोडी स्पष्टता मिळाली. 

“मी एक चांगली सुरूवात करण्यावर लक्ष केंद्रित केले. मी सामना संपवण्याचा प्रयत्न केला तेव्हा मी थोडा गडबडलो. मी मार्गदर्शक आणि कर्णधारासोबत चर्चा केली. त्यांनी मला सामना संपवण्याबद्दल विचार करू नकोस असे सांगितले. मला एक चांगला सेट फलंदाज व्हायचे आहे जो शेवटपर्यंत फलंदाजी करेल. प्रत्येकाची टीममध्ये एक जबाबदारी आहे आणि मी सेट असल्यावर मला मोठी धावसंख्या उभारायची आहे,” तो म्हणाला. 

ईशान आणि रोहित हे फक्त ओपनिंग जोडीदारच नाहीत तर ड्रेसिंग रूममधले वातावरण उदास असते तेव्हा मूड चांगला करणारे खेळाडूही आहेत. 

“रोहितभाई स्वतःला आणि टीमलाही प्रेरणा देतो. तो सर्वांना एकाच मार्गाच्या दिशेने नेण्याची खात्री करतो आणि आम्ही उर्वरित सामन्यांमध्ये सर्वोत्तम कामगिरी कशी करू शकू याचा विचार करतो. कुणालाही उदास वाटणार नाही याची मी काळजी घेतो. आम्ही या टीममध्ये एकमेकांना मदत करतो. प्रत्येकजण एकमेकांविषयी विचार करतो. मी स्वभावाने खूप विनोदी आहे. त्यामुळे मी इतर सर्वांचाही मूड चांगला करण्याचा प्रयत्न करतो,” ईशान म्हणाला. 

आणखी एक तरूण खेळाडू अशीच भूमिका निभावतो असेही त्याने सांगितले. 

“तिलक माझ्यासारखाच आहे. त्याला प्रत्येकाशी संवाद साधायला आवडतो. तो टीमसोबत हसत असतो. तो खेळ खूप गांभीर्याने खेळतो आणि मेहनत करतो. त्याने पहिल्याच सीझनमध्ये आपली ऊर्जा उत्तम ठेवली आहे. ही त्याच्याबाबतची सर्वोत्तम गोष्ट आहे,” ईशान म्हणाला. 

या सीझनमध्ये आणखी एका गोष्टीवर चर्चा केली गेली. ती म्हणजे ईशानची किंमत. पण या विकेटकीपर फलंदाज म्हणाला की त्याने या विषयावर जास्त विचार केलेला नाही. 

“तुमचा प्राइज टॅग तुमच्यासोबत फक्त काही दिवस राहतो. मी मागील काही काळापासून टॉप लेव्हलला खेळत होतो. त्याममुळे मी फक्त टीमसाठी सर्वोत्तम काय करू शकतो याचा विचार करतो. रोहितभाईसारखे ज्येष्ठ खेळाडू मला त्याबद्दल फार विचार करू नको असे सांगतात. ते मला माझ्या झोनमध्ये राहणे जास्त योग्य असल्याचेही सांगतात. त्यांच्याशी बोलल्याने मला हे बाजूला ठेवण्यात मदत झाली,” तो म्हणाला. 

ईशानने या सीझनमध्ये विकेट कीपर म्हणून आपल्या जबाबदारीचाही आनंद घेतला आहे. त्याने काही वर्षांनंतर सातत्याने एमआयसाठी विकेटकीपिंग केले आहे. 

“मला बऱ्याच काळानंतर विकेट कीपिंग करायची संधी मिळाली. मला फील्ड सेटिंगच्या मदतीने हे करायला जमते आहे कारण विकेट कीपरला फलंदाजाचा अंदाज सर्वप्रथम येतो. कर्णधार अनेक गोष्टींचा विचार करत असतो. त्यामुळे विकेट कीपर त्याच्यासाठी गोष्टी सोप्या करू शकतो,” त्याने शेवटी सांगितले. 

ईशानकडून आलेल्या या प्रामाणिक उत्तरांमधून हा संघ त्यांना कोणत्या गोष्टींवर काम करणे गरजेचे आहे हे जाणतो आणि सीएसकेविरूद्ध मैदानात या गोष्टींवर कशा प्रकारे अंमल करतात हे पाहणे रोमांचक असेल.