{{newNotification.notification_data.user_full_name}} {{newNotification.notification_data.extra_text}}
{{earlierNotification.notification_data.user_full_name}} {{earlierNotification.notification_data.extra_text}}
कोणत्याही सूचना नाहीत
लीडर. फायटर. षटकारांची महाराणी. #7. एक आख्यायिका. डब्ल्यूपीएलच्या लिलावात आपली सर्वांत पहिली निवड!
हे वर्ष होते २०१७. प्रतिस्पर्धी संघ होता ऑस्ट्रेलिया. जागा होती डर्बीशायर काऊंटी ग्राऊंड आणि निमित्त होते विश्वचषक उपांत्य फेरीचे. मग मधल्या फळीत काय झाले तो इतिहास आहे. एक अद्वितीय कामगिरी. हरमनप्रीत कौरने फटकेबाजी सुरू केली आणि ११५- चेंडूंमध्ये नाबाद १७१ धावा करून विक्रमांना तडाखे दिले आणि महिला क्रिकेटला पहिल्या पानावर आणून ठेवले.
पंजाबमधील मोगा येथे जन्मलेली आणि विरेंदर सेहवागचा आदर्श समोर ठेवून मोठी झालेल्या हरमनने २००९ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल टाकले आणि मागील काही वर्षांत ती या खेळाची खरी ब्लू सुपरस्टार ठरली आहे. ती फलंदाज आहे, ती गोलंदाज आहे ती सर्व ठिकाणी क्षेत्ररक्षण करू शकते, आणि ती कर्णधारही आहे. एमआयची मधली फळी ज्या दणकट खांबाभोवती बांधलेली आहे तो ती आहे. तिचे दणकेबाज व्यक्तिमत्व आणि सुपीक क्रिकेटिंग मेंदू यांच्यामुळे टीममध्ये एक अजिंक्य एटिट्यूड निर्माण झाला आहे.
तिने पलटनला २०२३ चा सर्वोच्च क्षण देताना एमआयला पहिला डब्ल्यूपीएल चॅम्पियन बनवले आहे. ती आहे कप्तान कौर!