{{newNotification.notification_data.user_full_name}} {{newNotification.notification_data.extra_text}}
{{earlierNotification.notification_data.user_full_name}} {{earlierNotification.notification_data.extra_text}}
कोणत्याही सूचना नाहीत
हायली मॅथ्यूजला एक लहान खेळाडू म्हणणे तिला कमी लेखणे ठरेल. वयाच्या ८ व्या वर्षी ती मुलांसोबत अंडर १२ खेळत होती. वयाच्या ११ व्या वर्षी ती अंडर १३ च्या मुलांच्या टीमची कर्णधार होती (असे करणारी पहिली मुलगी) आणि तिच्या टीममध्ये कार्लोस ब्रेथवेट आणि शाय होप होते. वयाच्या १६ व्या वर्षी ती आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळायला लागली आणि वयाच्या २४ व्या वर्षी ती वेस्ट इंडिजची कर्णधार होती.
एक आक्रमक फलंदाज, खूप महत्त्वाची ऑफ स्पिनर जी पॉवर प्लेमध्ये गोलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे आणि नेतृत्वाचा अनुभव असलेली ही ब्रिजटाऊनमध्ये जन्मलेली हायली एक परिपूर्ण पॅकेज आहे. ईडन गार्डन्सवर २०१६ मध्ये वेस्ट इंडिज क्रिकेटसाठी ती जादूई रात्र होती. तिने ४५ चेंडूंमध्ये ६६ धावा केल्या आणि वेस्ट इंडिजला टी२० विश्वचषक मिळवून दिला. तेव्हा ती फक्त १८ वर्षांची होती.
डब्ल्यूपीएल २०२३ मध्ये पर्पल कॅप विजेती आणि पाचव्या क्रमांकाची सर्वाधिक धावा करणारी खेळाडू, टी२०आयमध्ये आठ सलग सामनापटू पुरस्कार मिळवणारी ती खरीखुरी वाघीण आहे आणि ती आपल्याकडे हे.
‘चॅम्पियन, चॅम्पियन’