{{newNotification.notification_data.user_full_name}} {{newNotification.notification_data.extra_text}}
{{earlierNotification.notification_data.user_full_name}} {{earlierNotification.notification_data.extra_text}}
कोणत्याही सूचना नाहीत
मंगलदईमधून आलेल्या या मुलीने डब्ल्यूपीएलमध्ये आपल्या राज्यातून आलेली पहिली खेळाडू हा किताब मिळवून आसामला क्रिकेटच्या नकाशावर आणले आहे. जिंतामणी कलिताचा क्रिकेट प्रवास आपल्या भावासोबत सरावाला जाण्यापासून झाला. त्यानंतर तिने स्वतःच चेंडू हातात घेतला आणि ती लवकरच सलामीची गोलंदाज झाली. ही गोष्ट आहे २०१६ ची आणि नंतरच्या काही वर्षांत ती आसामच्या सीनियर टीममध्ये तसेच अंडर १९ विमेन्स चॅलेंजर ट्रॉफी २०२१ मध्ये इंडिया बी टीमसाठी खेळली. २०२२ मध्ये ती हाय परफॉर्मिंग कॅम्पसाठी नॅशनल क्रिकेट एकेडमी (एनसीए) मध्ये आमंत्रित करण्यात आलेल्या १९ वर्षांखालील पहिल्या २५ खेळाडूंपैकी एक होती.