बेव्हन-जॉन
बेव्हन-जॉन
जेकब्स
जेकब्स
जन्मतारीख
मे 6, 2002
फलंदाजीची शैली
राईट हैंडेड
गोलंदाजीची शैली
राईट हैंडेड
प्रोफाइल
माहिती
बेव्हन-जॉन बाबत

तुम्हाला एक जोरदार फटकेबाजी करणारा फलंदाज हवाय? बेवोन जेकब्स आहे ना! त्याच्या मते पहिला प्रभाव हा कायम टिकून राहणारा प्रभाव असतो. आमच्यावर विश्वास बसत नाही का? हा बघा त्याचा पुरावा:

त्याने सुपर स्मॅश २०२३-२४ कर्टन रेझरमध्ये आपल्या पहिल्याच सामन्यात कँटरबेरीसाठी २० चेंडूंमध्ये ४२ धावा कुटल्या. त्यानंतर जवळपास एका वर्षाने त्याने ऑकलंडसाठीच्या पहिल्या फर्स्ट क्लास सामन्यात दोन्ही इनिंग्समध्ये अर्धशतके फटकावली.

…आणि हो! त्याच्या नावावर एक टी२० शतकही आहे. या २२ वर्षीय खेळाडूने क्वीन्सलँड टी२० मॅक्स २०२३-२४ स्पर्धेच्या शेवटच्या सामन्यात टूमबुलविरूद्ध साऊथ ब्रिस्बेनसाठी ४० चेंडूंमध्ये १०० धावा फटकावल्या.

त्यात भर टाकताना आपल्या आगामी स्टारने २०२४-२५ च्या सुपर स्मॅशमध्ये सर्वधिक धावा करणाऱ्या पहिल्या पाच खेळाडूंमध्ये स्थान मिळवले आणि २०२४-२५ च्या फोर्ड ट्रॉफीमध्ये तो सातत्याने धावा करू लागला आहे. २०२४-२५ च्या प्लंकेट शील्डमध्ये सेंट्रल डिस्ट्रिक्टविरूद्ध ऑकलंडकडून १५७ धावांच्या क्लासिक खेळीच्या पार्श्वभूमीवर तो एमआय कॅम्पमध्ये आलाय.

पलटन, ब्लू अँड गोल्ड आऊटफिटमध्ये संपूर्ण तोडफोड करण्यासाठी सज्ज व्हा!