सूर्यकुमार
सूर्यकुमार
यादव
यादव
जन्मतारीख
सप्टेंबर 14, 1990
फलंदाजीची शैली
राईट हैंडेड
गोलंदाजीची शैली
राईट हैंडेड
प्रोफाइल
माहिती
सूर्यकुमार बाबत

स्काय इज दि लिमिट असं म्हणतात. पण स्कायसाठी खरंच काहीही लिमिट नाहीये.

गेल्या काही वर्षांत त्याने आपल्या 'तुम्हाला जमणारच नाही' अशा फटक्यांनी पांढऱ्या चेंडूवरील फलंदाजीचा इतिहास खरोखरच पुन्हा लिहिला आहे. त्याने २०११ मध्ये एमआयमध्ये खेळायला सुरुवात केली आणि त्याच वर्षी आपल्याला चॅम्पियन्स लीग टी-२० जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. २०१८ मध्ये आपण या लाडक्याला घरी परत आणले आणि तेव्हापासून, 'एकच वादा सूर्या दादा' चा जयघोष कधीही थांबलेला नाही.

फलंदाजीच्या क्रमात पहिल्या क्रमांकावर तो आला, प्रत्येक आयपीएलमध्ये ३०० पेक्षा जास्त धावा करणाऱ्या या सूर्याने स्वतःला टीमचा अविभाज्य घटक म्हणून सिद्ध केले आहे. आरसीबीविरूद्ध आक्रमक नाबाद ७९ (४३) कामगिरी करून त्याने मैं हूँ ना असे टीमला सांगितले.

दोन वेळा आयसीसी टी२०आय प्लेयर ऑफ दि इयर (२०२२,२०२३), भारताचा विद्यमान टी२०आय कर्णधार असलेला आपला दादा सूर्या आता केवळ एमआय स्टार म्हणूनच नव्हे तर आयपीएल २०२५ मध्ये फ्रँचायझीच्या फलंदाजांपैकी एक म्हणूनही त्याच्या वारशात एक नवा अध्याय लिहिण्यास सज्ज आहे.

आगामी काळात सूर्यकुमार यादव आणखी एकदा लाँग ऑफ... लाँग ऑफ... क्षण पुन्हा निर्माण करण्यासाठी सज्ज आहे!!!

तुम्ही मला येथे फॉलो करू शकता