{{newNotification.notification_data.user_full_name}} {{newNotification.notification_data.extra_text}}
{{earlierNotification.notification_data.user_full_name}} {{earlierNotification.notification_data.extra_text}}
कोणत्याही सूचना नाहीत
फिगेट स्पिनर्स हल्ली सगळ्यांच्या हातात दिसतात. पण पियूष चावलाला त्याची गरज नाही कारण त्याच्या बोटांमध्ये अशी काही जादू आहे की तो सहजपणे चेंडू फिरवू शकतो.
तो काही आपला नेहमीचा लेगी नाहीये. त्याचे लेग ब्रेक्स, गुगली, टॉप स्पिनर्स आणि १२५ किमीपेक्षा जास्त वेग या सगळ्यांमुळे तो खूप वेगळा ठरला आहे. या प्रक्रियेमुळे तो आयपीएलमध्ये सर्व काळातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वांत जास्त विकेट घेणारा स्पिनर मानला गेलाय. त्याने १६५ सामन्यांमध्ये १५७ विकेट्स घेतल्या आहेत. त्याच्या आंतरराष्ट्रीय करियरच्या रिझ्युमेमध्ये खूप जास्त सामने नसतील कदाचित परंतु १७ व्या वर्षी तो खेळायला आला तेव्हापासून त्याने स्वतःचा एक ठसा उमटवला आहे. त्याने गुगलीने केविन पीटरसनची घेतलेली विकेट आणि २०११ च्या विश्वचषकातील विजय या गोष्टी त्याच्या नावापुढे जोडल्या गेल्या आहेत.
दोन वेळचा आयपीएल विजेता असलेला पियूष एमआयसोबत २०२३ मध्ये दुसऱ्या वेळी खेळला आणि त्याने १६ सामन्यांमध्ये २२ विकेट्स घेतल्या. तो आयपीएल २०२४ मध्ये स्पिन डिपार्टमेंट नक्कीच सांभाळेल.