रोहित
रोहित
शर्मा
शर्मा
जन्मतारीख
एप्रिल 30, 1987
फलंदाजीची शैली
राईट हैंडेड
गोलंदाजीची शैली
राईट हैंडेड
प्रोफाइल
माहिती
रोहित बाबत

आपला लाडका. आपला हिटमॅन. आपला रेकॉर्ड ब्रेकर. २०२४ टी२० वर्ल्डकप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ विजेता कर्णधार!

आपण त्याने जी कामगिरी केली त्याची नोंद करूया. चालेल ना?

  • पाच टी२०आय शतके- या स्वरूपात कोणत्याही फलंदाजाने केलेली सर्वाधिक शतके.
  • तीन ओडीआय द्विशतके- हा विक्रम नोंदवणारा एकमेव फलंदाज
  • एकाच वर्ल्डकप आवृत्तीत पाच शतके (२०१९)- हा विक्रम करणारा एकमेव फलंदाज.
  • सहा आयपीएल ट्रॉफीज (एमआयसोबत पाच- डेक्कन चार्जर्ससोबत एक)- कोणत्याही खेळाडूने केलेल्या सर्वाधिक.

२००७ साली पहिल्या वर्ल्ड टी२० मध्ये आमची मुंबईच्या लाडक्या खेळाडूंपैकी एक असलेल्या रोहित शर्माकडे लोकांचे लक्ष गेले. त्याने भारताला ही ट्रॉफी मिळवून देण्यात खूप महत्त्वाची भूमिका बजावली. त्यानंतर त्याला डेक्कन चार्जर्सने आपल्याकडे घेतले. मग आपण त्याला २०११ च्या मेगा ऑक्शन्समध्ये सोबत आणले आणि त्यानंतर त्याला जाऊ दिलेले नाही. तो चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मधल्या विजयानंतर आपल्याकडे येतोय. आयपीएल २०२५ मध्येही दणकेबाज कामगिरी करताना आपण त्याला पाहणार आहोत.

तुम्ही मला येथे फॉलो करू शकता