ट्रेंट
ट्रेंट
बोल्ट
बोल्ट
जन्मतारीख
जुलै 22, 1989
फलंदाजीची शैली
राईट हैंडेड
गोलंदाजीची शैली
राईट हैंडेड
प्रोफाइल
माहिती
ट्रेंट बाबत

तो परत आलाय! आपला चॅम्प, आपला महान खेळाडू, आपला टीबी. २०२० च्या चॅम्पियन्स संघातून तो आयपीएल २०२५ च्या पॉकेटमध्ये परतला आहे.

स्विंग, जलदगती खेळ, डावखुरा अँगल, डेडली यॉर्कर आणि त्याची खतरनाक अचूकता. ट्रेंट बोल्ट हा किवीजचा महान खेळाडू नवीन आणि जुन्या व्हाइट बॉलमध्ये उत्तम खेळतोय.

ट्रेंटने २०११ मध्ये पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला. त्यानंतर मागच्या काही वर्षांत त्याने आपल्या भात्यात विविध प्रकारच्या नवीन ट्रिक्स आणल्या आहेत. त्याने मुंबई इंडियन्सला आपल्या पाचव्या विजयाकडे नेण्यात बजावलेली महत्त्वाची भूमिका सर्वांनाच लक्षात आहे. तो अंतिम सामन्यात आणि सीझनमध्ये २५ विकेट्स घेऊन सामनापटू ठरला.

कल्पना करा: वानखेडेवरची संध्याकाळची वेळ, ताजी पिच, समुद्रावरून येणारी संथ हवा, बोल्टी मैदानात धावतो, पलटन त्याच्यासाठी टाळ्या वाजवतेय. ओह, स्टंप्स उधळून जाण्यासाठी तयार आहेत. आपल्या डोळ्यांना ही सुंदर मेजवानी मिळेल.

तुम्ही मला येथे फॉलो करू शकता