कॉर्बिन
कॉर्बिन
बॉश
बॉश
जन्मतारीख
सप्टेंबर 10, 1994
फलंदाजीची शैली
राईट हैंडेड
गोलंदाजीची शैली
राईट हैंडेड
प्रोफाइल
माहिती
कॉर्बिन बाबत

पलटन, आपला आणखी एक झकास अष्टपैलू खेळाडू. दक्षिण आफ्रिकेकडून आलाय, #AalaRe!

एक विश्वासार्ह मधल्या फळीतील फलंदाज आणि एक उत्कृष्ट वेगवान गोलंदाज असलेला कॉर्बिन बॉश जगभरात फ्रँचायझी क्रिकेट खेळण्याचा अनुभव घेऊन येतो.

हा ३० वर्षीय खेळाडू एमआय केपटाऊनच्या #ClassOf2025 चा अमूल्य खेळाडू आहे. त्याने आठ इनिंग्समध्ये ११ विकेट्स घेऊन आपल्या दक्षिण आफ्रिकन संघाला पहिला एसए२० चषक जिंकण्यास मदत केली. आता आयपीएलमध्येही आपल्याला हेच पाहायला मिळेल.

आता आयपीएल २०२५ या दोन महिन्यांत हा उजव्या हाताने खेळणारा खेळाडू भारतीय उपखंडातही हीच विजयी घोडदौड सुरू ठेवेल आणि पाच वेळे चॅम्पियन्स असलेले संघ सहावा चषक घरी आणण्यासाठी तयार असताना महत्त्वाचे योगदान देत राहील. आमच्या मुंबईत स्वागत आहे, कॉर्बिन!

*कॉर्बिन बॉश लिझाद विल्यम्ससाठी बदली म्हणून खेळण्यास येणार आहे. तो दुखापतग्रस्त झाल्यामुळे आगामी सीझनमधून बाजूला झाला आहे.

तुम्ही मला येथे फॉलो करू शकता