हार्दिक
हार्दिक
पांड्या
पांड्या
जन्मतारीख
ऑक्टोबर 11, 1993
फलंदाजीची शैली
राईट हैंडेड
गोलंदाजीची शैली
राईट हैंडेड
प्रोफाइल
माहिती
हार्दिक बाबत

पूर्णपणे नवीन युगाचा खेळाडू. एक नवीन युगाची परिकथा. आपला कर्णधार!


हार्दिक पांड्या, एक खरा ब्लू मुंबई इंडियन्सचा आदर्श असलेला खेळाडू ब्लू अँड गोल्डमध्ये परतला आहे. २०१५-२०२१ या सात वर्षांच्या काळात तो एमआयच्या विजयी रथाचा सारथी बनला. त्याने टीमसाठी शक्य असलेली प्रत्येक गोष्ट केली- गोलंदाजी सुरू करणे, डेथ ओव्हर्समध्ये गोलंदाजी करणे, आवश्यक असलेली धावसंख्या आभाळाला भिडलेली असताना फलंदाजी करणे, आपल्या संघाला स्थिरावण्याची गरज असताना फलंदाजी, एक मजबूत किल्ला बनवणे असे सगळेच त्याने केले आहे. तो अतिशय शांत होता, लढण्यासाठी सज्ज आणि त्याला या मोठ्या मैदानात खेळायला आवडायचे


त्याच्या पहिल्या सीझनमध्येच सीएसकेविरूद्ध एमआयच्या वतीने खेळताना शेवटच्या दोन ओव्हर्समध्ये दहा धावांची गरज होती. त्याने चार चेंडूंवर तीन षटकार मारले आणि २१*(८) ची खेळी करून संघाला पराभवाच्या छायेतून बाहेर आणले. या सामन्यात आपण विजयी झालो. पुढची सात वर्षे त्याने सातत्याने अशीच कामगिरी आपल्यासाठी केली आहे.


तो आयपीएल २०२४ सीझनच्या सुरूवातीला परत आपल्या संघात आला. त्याने तोपर्यंत आणखी विक्रम केले होते. त्याचे नाव आणखी मोठे झाले होते. आता २०२५ मध्येही तो आपल्यासोबतच आहे. आपल्या पाच रिटेन केलेल्या खेळाडूंपैकी तो एक आहे ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे.

तुम्ही मला येथे फॉलो करू शकता