{{newNotification.notification_data.user_full_name}} {{newNotification.notification_data.extra_text}}
{{earlierNotification.notification_data.user_full_name}} {{earlierNotification.notification_data.extra_text}}
कोणत्याही सूचना नाहीत
त्याचा तो खास रन अप आणि हात तिरका वर करून गोलंदाजी करण्याची स्टाइल फक्त जसप्रीत बुमराची आहे. २०१३ आयपीएलमध्ये त्याने आपण काय चीज आहोत हे जगाला दाखवून दिले. त्याने पहिल्याच सामन्यात आरसीबीविरूद्ध ३/३२ अशी कमगिरी केली. त्याने विराट कोहली आणि एबी डे विलर्सच्या विकेट्स घेतल्या.
तो पहिल्यापासूनच एमआयसोबत होता. त्यानंतर भारतीय जलदगती गोलंदाजांचा तो लीडर ठरला. २०१७ मध्ये त्याची कामगिरी (आरपीएसजीविरूद्ध २/२६) आणि २०१९ चा अंतिम सामना (सीएसकेविरूद्ध २/१४) पाहून पलटन चाहत्यांची मनेच जिंकली नाहीत तर त्याने तणावाखाली काम करणारा खेळाडू कसा असतो हेही दाखवून दिले.
२०२५ च्या हंगामापर्यंत त्याने सर्व प्रकारच्या फॉर्मेटमध्ये स्वप्नवत कामगिरी केली आहे - २०२४ च्या टी२० विश्वचषकाचा विजयी समारोप प्लेअर ऑफ द टूर्नामेंटचा किताब मिळवून केला. त्याने पाच सामन्यांमध्ये ३२ विकेट्स घेत २०२४-२५ च्या बीजीटीमध्ये प्लेअर ऑफ द सीरिज पुरस्कार जिंकला आणि २०२४ चा सर्वोत्तम आयसीसी पुरुष क्रिकेटपटू म्हणून त्याचे नाव घोषित झाले.
गेल्या काही महिन्यांत खूप काही साध्य केल्यानंतर, पलटनला आयपीएल २०२५ मध्ये पुन्हा एकदा ट्रेडमार्क रन-अप, उखडलेले स्टंप आणि ट्रेडमार्क उत्साही उत्सव दिसण्याची अपेक्षा आहे! बूम, आम्ही वाट बघतोय!