{{newNotification.notification_data.user_full_name}} {{newNotification.notification_data.extra_text}}
{{earlierNotification.notification_data.user_full_name}} {{earlierNotification.notification_data.extra_text}}
कोणत्याही सूचना नाहीत
त्याने केपटाऊनमध्ये स्वतःला सिद्ध केले आणि आता एमआय युनिव्हर्सला ओलांडून तो मुंबईचे अवकाश उजळवण्यासाठी येतो आहे. मुंबई इंडियन्सचा हा विकेट कीपर पहिल्या फळीत फलंदाजी करतो. त्याने स्वतःच्या नावावर इतिहास रचला आहे. रायन रिकेलटन आपल्यासाठी तेच वचन घेऊन आला आहे.
… आणि आयपीएल २०२५ नंतरचा मेगा लिलाव कालावधी या खेळाडूसाठी असाधारण राहिला आहे! चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या अफगाणिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिकेच्या सलामीच्या सामन्यात त्याने १०३ धावांची अविश्वसनीय खेळी केली.
हे एवढ्यावरच थांबत नाही! २०२५ मध्ये एमआय केपटाऊनला त्यांचे पहिले SA20 विजेतेपद मिळवून देण्यात रायनने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्याने आठ डावांमध्ये ४८ च्या सरासरीने ३३६ धावा केल्या. लै भारी!
रिकेल्टन दादा, वानखेडेवर तुम्हाला त्याच कामगिरीची पुनरावृत्ती करताना पाहण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत! चला जाऊया!