{{newNotification.notification_data.user_full_name}} {{newNotification.notification_data.extra_text}}
{{earlierNotification.notification_data.user_full_name}} {{earlierNotification.notification_data.extra_text}}
कोणत्याही सूचना नाहीत
हा २८ वर्षीय गयानी दिग्गज खेळाडू एक परफेक्ट ऑलराऊंडरची प्रतिष्ठा बाळगून आहे. त्याच्याकडे अनेक ट्रिक्स आणि वैविध्यपूर्णता आहे. त्यामुळे त्याला कोणत्याही परिस्थितीत गोलंदाजीसाठी आमंत्रित करता येते. त्याच्या भात्यात फलंदाजीतलेही अनेक हिट्स आहेत. त्यामुळे इनिंग यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी त्याच्यावर डोळे मिटून विश्वास ठेवता येतो.
२०१६ मध्ये प्रादेशिक सुपर ५० स्पर्धेत गयानासाठी पहिला देशांतर्गत सामना खेळताना पहिल्याच सामन्यात त्याने प्रभाव टाकला आणि प्रचंड वेगाने तो पहिल्या काही क्रमांकांवर आला. त्यानंतर गयाना एमेझॉन वॉरियर्ससोबत तो सीपीएल खेळला. त्यानंतर २०१८ मध्ये वेस्ट इंडिजसाठीही त्याला निवडण्यात आले. टी२० वर्तुळात त्याच्या नावावर मोठी आकडेवारी आहे. त्याचा फलंदाजीचा स्ट्राइक रेट १५० पेक्षा जास्त असून त्याने ९९ सामन्यांमध्ये २३ च्या सरासरीने १०९ विकेट्स घेतल्या आहेत
सनरायझर्स हैदराबाद (२०२२) आणि लखनौ सुपर वॉरियर्स (२०२३) नंतर मुंबई इंडियन्स ही शेफर्डची तिसरी फ्रँचायझी असणार आहे. आपला बालेकिल्ला म्हणजे वानखेडे स्टेडियम फलंदाजीचे नंदनवन आहे. त्यामुळे मरीन ड्राइव्ह्जवर आता चेंडू उडून पडले तर शेफर्ड फलंदाजीला उतरलाय असे समजायला हरकत नाही.