{{newNotification.notification_data.user_full_name}} {{newNotification.notification_data.extra_text}}
{{earlierNotification.notification_data.user_full_name}} {{earlierNotification.notification_data.extra_text}}
कोणत्याही सूचना नाहीत
पलटन, हा आहे विल जॅक्स. एक स्फोटक ब्रिटिश अष्टपैलू फलंदाज. तो पाच वेळा चॅम्पियन्स ठरलेल्या टीमसाठी खेळायला आलाय. त्यामुळे आपल्याला नुस्ता राड्याची १०० टक्के गॅरंटी मिळेल.
स्फोटक कामगिरी करणारा गोलंदाज म्हणून त्याचं नाव प्रसिद्ध आहेच पण त्याचबरोबर तो एक उपयुक्त ठरणारा ऑफ स्पिनर आहे. जॅकने १५७+ अशा आश्चर्यचकित करणाऱ्या स्ट्राइक रेटसह ५००० पेक्षा जास्त टी२० धावा केल्या आहेत आणि त्याचबरोबर ५० पेक्षा जास्त विकेट्सही घेतल्या आहेत.
तो पॉवरप्लेमध्येही धोकादायक ठरू शकतो. आपण त्याच्यावर एक गेम चेंजर म्हणून डोळे मिटून विश्वास ठेवू शकतो. त्याची चेंडूने विकेट घेण्याची क्षमता बघाल तर आपल्याकडे एक अष्टपैलू हिरा आलाय याची खात्री पटेल. हा २६ वर्षीय खेळाडू वानखेडेवर चांगलीच फटकेबाजी करेल आणि एमआयच्या विजयाच्या प्रयत्नात भर घालेल यात शंका नाही.