{{newNotification.notification_data.user_full_name}} {{newNotification.notification_data.extra_text}}
{{earlierNotification.notification_data.user_full_name}} {{earlierNotification.notification_data.extra_text}}
कोणत्याही सूचना नाहीत
तुम्हाला वेग हवाय? त्याच्याकडे आहे. आक्रमकता हवीय? त्याच्याकडे आहे. तुम्हाला मस्त धमाल करायचीय? तो तर त्यात मास्टर आहे. तो आहे गेराल्ड कोत्झी आणि आपल्या नवीन, ताज्या, उत्साहाने भरलेल्या गोलंदाजीने फलंदाजांच्या काळजात धडकी भरायला तयार आहे.
तो किमान ताशी १४५ किमी या वेगाने गोलंदाजी करतो. कोत्झीच्या करियरचा आलेख सातत्याने उंचावतोच आहे. तो वयाच्या १६ व्या वर्षी दक्षिण आफ्रिकेच्या यू-१९ टीममध्ये खेळला, दोन यू-१९ विश्वचषक (२०१८, २०२०) खेळला आणि २०२२ मध्ये त्याला प्रोटीआजसाठी सीनियर खेळाडू म्हणून त्याला बोलावण्यात आले. त्यानंतर त्याने २०२३ विश्वचषकात २० विकेट्स घेऊन स्टार झाला. आता वानखेडेवर त्याचा तोफखाना कधी चालतो याची आम्ही वाट बघत आहोत.