मुजीब
मुजीब
उर रहमान
उर रहमान
जन्मतारीख
मार्च 28, 2001
फलंदाजीची शैली
राईट हैंडेड
गोलंदाजीची शैली
राईट हैंडेड
प्रोफाइल
माहिती
मुजीब बाबत

पलटन, मुजीब-ओ-क्लॉक साठी तयार आहात ना!

जादुई स्पिनर आपल्या खास स्पिन गोलंदाजीसह प्रतिस्पर्धी संघाच्या काळजात धडकी भरवण्यासाठी तयार आहे.

आपल्या करियरच्या सुरूवातीलाच मुजीबने २०१७ मध्ये अफगाणिस्तानला आपला पहिला U-19 आशिया कप जिंकायला मदत केली. त्याने सलग तीन वेळा पाच विकेट्स घेऊन पाच सामन्यांमध्ये २० विकेट्स घेतल्या. कसलं भारी ना!

फेब्रुवारी २०१८ मध्ये तो वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी ओडीआयमध्ये पाच विकेट्स घेणारा सर्वांत तरूण क्रिकेटपटू ठरला. त्याने झिम्बाब्वेविरूद्ध अफगाणिस्तानला १० विकेट्सनी विजय मिळवण्यात मदत करताना ५/५० विकेट्स घेतल्या. हा विक्रम अजूनही कायम आहे!

मुजीब भाऊचे पाय पाळण्यातच दिसले होते. त्यामुळे ब्लू अँड गोल्डमध्ये ते काय काय धमाल करतात हे पाहायला मजा येईल.

तुम्ही मला येथे फॉलो करू शकता