{{newNotification.notification_data.user_full_name}} {{newNotification.notification_data.extra_text}}
{{earlierNotification.notification_data.user_full_name}} {{earlierNotification.notification_data.extra_text}}
कोणत्याही सूचना नाहीत
स्टँडमधून एमआयचा झेंडा फडकावणाऱ्या लहान मुलापासून ते एमआय जर्सी अभिमानाने घालणारा तरूण खेळाडू इथपर्यंतचा अर्जुन तेंडुलकरचा ब्लू अँड गोल्डचा प्रवास आहे.
जगातल्या सर्वांत महान खेळाडू आणि मुंबई इंडियन्सचा आयकॉन असलेल्या सचिन तेंडुलकरचा मुलगा असलेल्या अर्जुननेही स्वतःला आपल्या वडिलांप्रमाणेच एक अष्टपैलू खेळाडू सिद्ध केले आहे.
उंच, वेगाने खेळणारा, बॉल आणि बॅटने उत्तम स्विंग करणाऱ्या अर्जुनने मुंबईसोबत आपले देशांतर्गत क्रिकेट करियर सुरू केले. पण त्यानंतर २०२२ मध्ये तो गोव्यासाठी खेळू लागला. मग त्याने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये गोलंदाजीचे नेतृत्व करण्याची जबाबदारी उचलली.
त्याने आपल्या रणजीतल्या पहिल्या सामन्यात राजस्थानविरूद्ध १२० आणि ३/१०४ अशी कामगिरी करून स्वतःला सिद्ध केले. तो २०२१ मध्ये एमआयसोबत आला. त्यानंतर २०२२ मध्ये मेगा ऑक्शनमध्ये परत निवडला गेला. मागच्या दोन सीझनच्या आयपीएलमध्ये नवीन चेंडूसह त्याचे छोटे पण सुंदर खेळ त्याला पलटनचा लाडका बनवून गेले आहेत.
आम्ही २०२५ मध्येही तुला कुठे जाऊ देणार नव्हतो, अर्जुन!