मोहम्मद
मोहम्मद
नबी
नबी
जन्मतारीख
जानेवारी 1, 1985
फलंदाजीची शैली
राईट हैंडेड
गोलंदाजीची शैली
राईट हैंडेड
प्रोफाइल
माहिती
मोहम्मद बाबत

अफगाणिस्तानमध्ये क्रिकेटचा योद्धा असलेला मोहम्मद नबी एक परिपूर्ण क्रिकेटपटू आहे. तो अत्यंत आत्मविश्वासाने फलंदाजी करतो, अप्रतिम गोलंदाजी करतो आणि उत्तम क्षेत्ररक्षक आहे. आयपीएल २०२४ मध्ये पलटनचा उत्साह वाढवण्यासाठी त्याची ही क्षमता पाहण्याजोगी आहे.


वयाच्या १० व्या वर्षी गल्ली क्रिकेट खेळण्यापासून ते २००८ पासून अफगाणिस्तानला ओडीआय स्टेटस मिळवण्यास मदत करणे त्यानंतर आपल्या देशाला तीन टी२० विश्वचषकांमध्ये सहभागी होण्यास पाठिंबा देणे (२०१०, २०१२ आणि २०१४) आणि २०१५ मध्ये पहिला ओडीआय विश्वचषक मिळवून देण्यास मदत करण्यापर्यंत अनेक गोष्टी या महान खेळाडूने केल्या आहेत आणि त्यासाठी शब्द पुरेसे ठरणार नाहीत.


आयपीएलमध्ये निवडला जाणारा अफगाणिस्तानचा पहिलावहिला क्रिकेटपटू. तो आता एमआय जर्सी मिरवणारा आपल्या देशातला पहिलावहिला क्रिकेटपटू ठरेल.

तुम्ही मला येथे फॉलो करू शकता