क्वेना
क्वेना
मफाका
मफाका
जन्मतारीख
एप्रिल 8, 2006
फलंदाजीची शैली
लेफ्ट हैंडेड
गोलंदाजीची शैली
लेफ्ट हैंडेड
प्रोफाइल
माहिती
क्वेना बाबत

प्रचंड वेग, आक्रमकता आणि विकेट्स घेताना काय माहीत कसं झालं! असा स्वभाव, ओळखा पाहू कोण? आम्ही जसप्रीत बुमराबद्दल बोलत नाही आहोत. हा आहे आपला नवीन खेळाडू क्वेना मफाका.


जोहान्सबर्गमधला हा खेळाडू वयाच्या 17 व्या वर्षी क्रिकेटच्या प्रेमात पडला ते त्याच्या भावामुळे. आणि तेव्हापासून तो अत्यंत वेगाने प्रगती करतो आहे. सेंट स्थित्यंसमधला हा स्कॉलर, त्याने स्वतःचा एक सुंदर रेझ्युमे तयार केलाय. वयाच्या 15 व्या वर्षी दक्षिण आफ्रिका यु 19 टीम, दोन यू 19 विश्वचषक, 2024 विश्वचषकात 24 विकेट्स, एका सामन्यात सर्वाधिक विकेट्स घेणारा जलदगती गोलंदाज, सीएसए टी 20 चॅलेंज 2024 मध्ये चार सामन्यांत सात विकेट्स आणि ताशी 140 चा वेग हे सगळं त्याच्या नावावर आहे.


ब्लू अँड गोल्डमधील श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा, जसप्रीत बुमरा आणि मुख्य प्रशिक्षक मार्क बाऊचर यांच्या अधिपत्याखाली तो तयार आहे. तो आता आपल्या करियरचा नवीन अध्याय ब्ल्यू आणि गोल्डसोबत लिहील.

तुम्ही मला येथे फॉलो करू शकता