News

“वरिष्ठांनी मला कोणताही ताण न घेता खेळायला सांगितले आहे”: नमन धीर

By Mumbai Indians

मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यादरम्यानचा रविवारी (७ एप्रिल) खेळवला जाणारा आयपीएल सामना ईएसए डे म्हणून साजरा केला जाईल. हा एमआय #OneFamily साठी एक खास क्षण आहे. 

आता खास गोष्टींबद्दल सांगायचे झाले तर आपला क्लास ऑफ २०२४ चा तरूण खेळाडू नमन धीर याने सामन्यापूर्वी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्याने आपला खेळ, आपल्या महत्त्वाकांक्षा आणि आपल्या कॅम्पेनला पुढे नेण्याबाबत चर्चा केली.

“आयपीएलमध्ये खेळणे हे प्रत्येक क्रिकेटपटूचे स्वप्न असते. मुंबई इंडियन्स या सर्वाधिक यशस्वी टीम्सपैकी एकीने मला ही संधी दिली त्याबद्दल मी आभारी आहे. टीमचे वातावरण उत्तम आहे आणि मला त्याची मजा येतेय,” असे मत नमनने एमआयमध्ये सहभागी होण्याबाबतचे आणि टीव्हीवर एक चाहता म्हणून सामना बघण्यापासून ते मैदानात खेळाडू म्हणून उतरण्यापर्यंत झालेल्या बदलाची संधी मिळालेला एक खेळाडू म्हणून व्यक्त केले.

आपल्या करियरमध्ये फक्त चार टी२० सामने खेळलेल्या नमनला एमआयने सीझनचा पहिला सामना खेळण्याची संधी दिल्यामुळे अनेकांना खूप आश्चर्य वाटले. या अष्टपैलू फलंदाजाने आयपीएल क्रिकेटमधल्या आपल्या पहिल्या सामन्याबाबत सांगितले.

“सामन्याच्या (गुजरातविरूद्ध) आदल्या दिवशी हार्दिकभाई माझ्याकडे आले आणि म्हणाले की तू खेळणार आहेस. मी सराव सामन्यात चांगला खेळल्याने मला टीममध्ये खेळायची संधी मिळाली असे मला वाटते.”

सुरूवातीच्या सामन्यात नमनला खेळताना आपण पाहिले. त्याला वरच्या फळीत फलंदाजीला आणले गेले. त्याला वरिष्ठ खेळाडूंनी काही टिप्स दिल्या का?

“फलंदाजीच्या सल्ल्याबद्दल सांगायचे झाल्यास वरिष्ठांनी मला माझ्या पद्धतीने खेळायला सांगितले होते. मला कुणालाही काहीही सिद्ध करायची गरज नाही. त्यांनी मला सांगितले की मी बाहेर जाऊन कोणताही ताण न जाणवता खेळायला मुक्त आहे,” असे तो म्हणाला.

आयपीएल २०२४ मध्ये एमआयची सुरूवात कठीण झाली आहे. त्याचा परिणाम ड्रेसिंग रूममध्ये दिसतो का? नमन धीरने याला अत्यंत आशावादी उत्तर दिले.

“वातावरण अजूनही चांगले आहे. टीममधील नातेदेखील घट्ट आहे. आम्हाला अजून ११ सामने खेळायचे आहेत. त्यामुळे पुढील टप्प्यासाठी आम्ही पात्र ठरू अशी आशा वाटते.

“मी काहीही ध्येये ठेवलेली नाहीत. मी मुक्तपणे खेळण्याचा आणि उत्तम खेळण्याचा प्रयत्न करतो आहे जेणेकरून टीमला सामने जिंकायला मदत होऊ शकेल.”

अगदी बरोबर. हाच आत्मविश्वास आणि टीमची चिकाटी, तसेच हजारो मुलांचे प्रत्यक्ष पाठबळ यांच्यामुळे रविवारची दुपार दणदणीत जाईल याची आम्हाला खात्री वाटते.