News

हार्दिक आला रे! मिशन आयपीएल २०२४ चा सराव सुरू!

By Mumbai Indians

प्रतीक्षा आता संपली आहे! मुं-बॉइ-ज आले आहेत. त्यांच्याकडे आहे एक नवीन दृष्टीकोन आणि आयपीएलची ट्रॉफी जिंकण्याची एक नवीन भूक.

क्लास ऑफ २०२४ चे काही सदस्य रविवारी चेहऱ्यावर एक मोठ्ठे हसू घेऊन आले. ते नवीन खेळाडूंना भेटण्यासाठी उत्सुक होते. त्यांना आपला कराटे किड गेराल्ड कोत्झीलाही भेटायची उत्सुकता होती. या खेळाडूंसोबत प्रमुख प्रशिक्षक मार्क बाऊचर आणि एमआयचा महान खेळाडू आणि आपला नवीन गोलंदाजी प्रशिक्षक लसिथ मलिंगा हेदेखील आहे.

कोत्झीबरोबरच अंशुल कंबोज, शिवालिक शर्मा आणि श्रेयस गोपाळ (सहा वर्षांनी एमआय कॅम्पमध्ये पुनरागमन) हेदेखील ब्लू आणि गोल्डमध्ये प्रथमच सराव करताना दिसले. त्यांनी परतलेल्या अर्जुन तेंडुलकर, विष्णू विनोद आणि आकाश मधवाल यांच्यासोबत सराव केला. एमआय मेंटॅलिटी रूजवण्याची सुरूवात अशा रितीने झाली.

पलटनला पुन्हा एकदा आपला कर्णधार हार्दिक पांड्या आल्याचाही आनंद झाला आहे. तो जराही वेळ न घालवता मिशन आयपीएल २०२४ साठी आपली तयारी सुरू करण्याच्या दृष्टीने नेट्समध्ये गेला.
क्रिकेट क्लब ऑफ इंडिया (मुंबई) येथे सराव सत्रे आणि आयपीएल मोडमध्ये जाण्यासाठी खेळाडू गाळत असलेला घाम तसेच कोचिंग टीमसोबत मजेशीर व महत्त्वाच्या संवादांच्या फैरी या सगळ्यांमुळे आगामी सीझनमध्ये काय होणार याची उत्सुकता टांगणीला लागली आहे.

पलटन! कमेंट्स भरून टाका आणि तुमच्या भावना व्यक्त करा कारण आम्ही तुमचे सगळे लाडके स्टार मैदानात आणण्यासाठी तयारी करत आहोत. दुनिया हिला देंगे हम!