
174 आयपीएल विकेट्स आणि पुढे सुरू - एमआयच्या इतिहासात बूमचे नाव सुवर्णाक्षरांनी कोरले गेलेय!
रेकॉर्ड्स ब्रेक करायची वेळ येते तेव्हा स्टाइलसाठी आपल्या नॅशनल ट्रेझरवर नक्कीच विश्वास ठेवावा. 💥 जसप्रीत बुमराह- आपला खास यॉर्कर किंग. त्याने आयपीएल इतिहासात मुंबई इंडियन्ससाठी सर्वाधिक विकेट्स घेणारा खेळाडू म्हणून स्वतःचे नाव कोरले आहे. त्याने आपल्या महान खेळाडू लसिथ मलिंगालाही मागे टाकले आहे! 🙌
या उजव्या हाताने खेळणाऱ्या जलदगती खेळाडूने आपल्या आयपीएल २०२५ ईएसए मॅचडेच्या दिवशी एलएसजीविरूद्ध चार विकेट्सची कामगिरी करताना हा टप्पा पार केला. आपल्या लाडक्या घरच्या मैदानावर लहान मुलांच्या जल्लोषात हा विक्रम पार पडला.
344* wickets in #TATAIPL - 𝗠𝗜 𝗟𝗘𝗚𝗘𝗡𝗗𝗦 🎯💥@ril_foundation | #ESADay #EducationAndSportsForAll #MumbaiIndians #PlayLikeMumbai #MIvLSG pic.twitter.com/C8RwtBdn6R
— Mumbai Indians (@mipaltan) April 27, 2025
आपल्या पहिल्याच आयपीएल विकेटच्या स्वरूपात विराटला बाद करण्यापासून ते काही अद्वितीय रॉकेट्स पेटवण्यापर्यंत, बुमराहचा प्रवास एखाद्या सिनेमापेक्षा कमी नाही.
त्याच्या अप्रतिम संथ गोलंदाजीसह आणि देखण्या डेथ ओव्हर्सपर्यंत जस्सी भाईने जगभरातील फलंदाजांसाठी एक दुःस्वप्न ठरण्याचे काम केले आहे आणि आता तो मुंबई इंडियन्सचा गोट ठरला आहे! 🐐
आपल्या कधीही हार न मानण्याच्या वृत्तीने बुमराहने आपण एक वेगळे खेळाडू आहोत हे सिद्ध केले आहे. अत्यंत कठीण परिस्थितीत गोलंदाजी करणे असो किंवा सर्वोत्तम विकेट्स घेणे असो. आपल्या नंबर ९३ ने या मोठ्या पडद्यावर धुमाकूळ घातला आहे.
हा महत्त्वाचा टप्पा एक स्मरणही आहेः #OneFamily चा विषय येतो तेव्हा परिकथा थांबत नाहीत. त्या पुढच्या लाटेला प्रेरणा देतात. 🤩 बुमराह भावा तुला पुढच्या १७४ विकेट्ससाठी शुभेच्छा… 👏
मुंबई इंडियन्ससाठी सर्वाधिक आयपीएल विकेट्स
आकडेवारी २७ एप्रिल २०२५ नुसार.
खेळाडू |
इनिंग |
विकेट्स |
जसप्रीत बुमराह* |
१३९ |
१७४ |
लसिथ मलिंगा |
१२२ |
१७० |
हरभजन सिंग |
१३४ |
१२७ |
मिशेल मॅकक्लेनगन |
५६ |
७१ |
कायरन पोलार्ड |
१०७ |
६९ |
हार्दिक पांड्या* |
८१ |
६५ |
ट्रेंट बोल्ट* |
३९ |
५१ |
कृणाल पांड्या |
८१ |
५१ |
राहुल चहर |
३९ |
४१ |
मुनाफ पटेल |
३१ |
४० |
*मुंबई इंडियन्सचे विद्यमान खेळाडू