News

कायरन पोलार्डची #13वर्षे– एमआयसाठी त्याचे सर्वोत्तम १३ खेळ

By Mumbai Indians

१३ दिमाखदार वर्षे. पाच आयपीएल चषक. दोन चॅम्पियन्स लीग टी२० चषक. एक अविस्मरणीय प्रवास.

कायरन पोलार्ड एक सुपरस्टार आहे आणि तो २०१० सालापासून मुंबई इंडियन्सचा एक महत्त्वाचा घटक राहिला आहे. आमचा एक महान क्रिकेटपटू ३४१२ धावा, ६९ विकेट्स आणि अगणित उच्चांक गाठून निवृत्त होत असताना आम्ही त्याच्या अविस्मरणीय खेळांचा गौरव करत आहोत.

1.     आयपीएल २०१३ अंतिम फेरी | एमआय विरूद्ध सीएसके: पोलार्डचा लढा, एमआयने पहिला आयपीएल चषक पटकावला

कोलकात्यात झालेल्या २०१३ सालच्या आयपीएल अंतिम फेरीत पोलार्डच्या बॅटमधून अप्रतिम खेळ झाला आणि त्याने एमआयसाठी विजयी खेळी केली. आधी फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या टीमला ५२/४ वर नामुष्की पत्करावी लागेल असे दिसत असताना पोलार्ड चेन्नई सुपर किंग्सविरूद्ध आपल्या सर्वोत्तम इनिंगसाठी खेळायला उतरला. त्याने ३२ चेंडूंमध्ये ६० धावा फटकावल्या. त्यामुळे एमआयला २० ओव्हर्समध्ये १४८/५ अशी चांगली धावसंख्या उभारता आली आणि त्याने एक विकेट्सही घेतली. मोठ्या स्टेजवर मोठ्या चॅम्पियनचा उदय झाला!

2.     आयपीएल २०१२ | आरआर विरूद्ध एमआय: ६४ धावा आणि चौकारांचा पाऊस

पोलार्ड चौकार आणि षटकारांपेक्षा दुसरे काही बोलतच नाही असे म्हटले जाते. त्याने ३३ चेंडूंमध्ये ६४ धावा केल्या. त्यात त्याने सहा चौकार आणि चार षटकार फटकावले. त्यानंतर त्याच्या गोलंदाजीदरम्यान त्याने ४-०-४४-४ धावा दिल्या. एमआयने १९७ धावा केल्या. नंतर गोलंदाजीही जोरदार केली आणि या सगळ्यात बराचसा भाग त्यानेच सांभाळला होता.

3.     आयपीएल २०१० | एमआय विरूद्ध आरसीबीः पोलार्ड मॅनियाचा ट्रेलर

एमआयसोबतच्या पहिल्या सीझनमध्ये कायरन पोलार्डने जगाला पुढील वर्षांमध्ये आपण काय खेळणार आहोत याची एक झलक दाखवली. त्याने या सीझनमध्ये १८५.७१ च्या स्ट्राइक रेटने २७३ धावा केल्या आणि १५ विकेट्स घेतल्या. उपांत्य फेरीत आरसीबीविरूद्ध त्याचा अप्रतिम परफॉर्मन्स झाला. एमआयने आधी फलंदाजी करून १८४/५ अशी धावसंख्या पूर्ण केली आणि पोलार्डने १३ चेंडूंमध्ये ३३ धावा केल्या. विराट कोहली, मनिष पांडे आणि रॉबिन उत्थप्पा यांच्याही विकेट्स त्याने घेतला. त्याने दुसऱ्या इनिंगमध्ये राहुल द्रविडलाही बाद केले.

4.     आयपीएल २०१९ | एमआय विरूद्ध के११पी: के११पीविरूद्ध ३१ चेंडूंमध्ये ८३ धावा

प्रभारी कर्णधार म्हणून आपल्या पहिल्या सामन्यात पोलार्डने अत्यंत नेत्रदीपक खेळ केला. मुंबईची स्थिती चिंताजनक होती. त्यांना १९८ धावांचा पाठलाग करायचा होता. पण पोलार्ड आला आणि परिस्थिती बदलली. तो या वेळी चौथ्या क्रमांकावर आला. त्याने २७० च्या स्ट्राइक रेटने ३१ चेंडूंमध्ये ८३ धावांचा पाऊस पाडून किंग्स ११ पंजाबच्या गोलंदाजांना आसमान दाखवले. त्याने या इनिंगमध्ये १० षटकार ठोकले. सनथ जयसूर्यानंतर एमआयच्या फलंदाजाने फटकावलेली ही दुसऱ्या क्रमांकाची षटकारांची संख्या होती.

5. आयपीएल २०१३ | सीएसके विरूद्ध एमआय: एकखांबी धावांचा बादशाह

त्याने आपला नेहमीचा डेथ ओव्हर्समधला गोलंदाजांच्या डोळ्यांसमोर तारे चमकवणारा खेळ सुरू केला आणि ३८ चेंडूंमध्ये ५७ धावा करून एमआयला १४८/६ वर नेले. या सामन्यात शेवटच्या पाच ओव्हर्समध्ये त्याने ५२ धावा केल्या. त्यानंतर एमएस धोनीने पाठलाग नियंत्रणात आणल्यानंतर सामन्याच्या शेवटच्या ओव्हरमध्ये डीप मिड विकेटच्या सीमारेषेवर अप्रतिम कॅच पकडून त्याला बाद केले आणि एमआयला निसटता विजय मिळवून दिला.

6.     आयपीएल २०२० | सीएसके विरूद्ध एमआय: मास्टरमाइंड पोलार्ड

मुंबई इंडियन्सचा कर्णधार म्हणून काम करण्याची संधी मिळालेल्या काही सामन्यांमध्ये पोलार्डने आपल्या डावपेचांची चुणूक दाखवली. आयपीएल २०२० मध्ये चेन्नई सुपर किंग्सविरूद्ध सामन्यात रोहित शर्मा नसताना त्याने जलदगती गोलंदाजांचा आक्रमक वापर करून सर्वांना आश्चर्यचकित केले. पिचवर वेग पकडता येईल हे दिसून आल्यावर पोलार्डने आक्रमक क्षेत्ररक्षणासाठी तयारी केली आणि प्रथम आलेल्या गोलंदाजांना जास्त वेळ गोलंदाजी करू दिली आणि सीएसकेच्या पहिल्या फळीचा कणाच मोडला. त्याने एका टप्प्यावर तर तीन स्लिप्स ठेवल्या होत्या.  

7. आयपीएल २०१३| एमआय विरूद्ध एसआरएच: १० मध्ये ९ ते २७ मध्ये ६६

२०१३ मध्ये लीग टप्प्यावरील सनरायझर्स हैदराबादविरूद्ध सामन्यात मुंबई इंडियन्स हरणार असे दिसत होते. चार ओव्हर्समध्ये ६२ धावा हव्या असताना वानखेडेवर अगदी चिडीचूप शांतता होती. पोलार्डने १७ व्या ओव्हरमध्ये थिसरा परेरा याच्या गोलंदाजीला खिंडार पाडून २९ धावा फटकावल्या आणि प्रेक्षकांनी जोरात जल्लोष केला. त्याने एका टप्प्यावर १० चेंडूंमध्ये ९ धावांवरून २७ चेंडूंमध्ये ६६ धावांपर्यंत मजल मारली आणि प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. त्यामुळे एमआयला जवळपास अशक्य असलेली धावसंख्या तीन चेंडू शिल्लक असताना पूर्ण करता आली. त्याच्या या खेळाला सलाम!

8.     आयपीएल २०२१ | एमआय विरूद्ध सीएसके: विक्रमी आयपीएल पाठलागाचा आधार

२०२१ मध्ये चेन्नई सुपर किंग्सविरूद्ध एमआयचा संघ १० ओव्हर्समध्ये ८४/३ वर आला होता. त्यांना जिंकण्यासाठी २१९ या भल्यामोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा होता. १० ओव्हर्समध्ये १३५ धावांची गरज असताना हा सामना पलटनच्या हातातून जातो असे दिसत होते. पण पोलार्डच्या मनात वेगळेच काही होते. त्याने अत्यंत स्फोटक खेळ करून (३४ चेंडूंमध्ये ८७ धावा) विस्मयकारक पद्धतीने शेवटच्या चेंडूवर सामना जिंकून दिला आणि सामन्याच्या इतिहासात सर्वांत मोठा धावांचा पाठलाग करण्याचा विक्रम नोंदवला.

9. आयपीएल २०१४ | आरआर विरूद्ध एमआयः सीझनचा सर्वोत्तम कॅच एक्रोबॅटिक पोलार्डच्या हातात

हवेत उडून अगदी सहजपणे कॅच पकडण्याच्या पोलार्डच्या क्षमतेमुळे आयपीएलच्या अत्यंत अविस्मरणीय क्षणांचा अनुभव प्रेक्षकांना घेता आला आहे. अशीच एक घटना एमआयच्या २०१४ मधील अहमदाबादमधील राजस्थान रॉयल्सविरूद्ध लीग टप्प्यामधील सामन्यात घडली. केव्हर कूपरच्या जोरदार हिटमुळे षटकार जाणार असे दिसत असताना एक मीटरवर पोलार्डने चेंडू पकडण्यासाठी उंच उडी मारली. पण तो सीमारेषेपलीकडे जाणार असतानाच त्याने चेंडू पुन्हा मैदानात टाकला आणि पुन्हा एकदा पकडला. हे फक्त पॉलीच करू शकला असता. त्याच्याकडे एक्रोबॅटिक्सची कौशल्ये आहेत हे आम्हाला माहीतच नव्हते!

10. आयपीएल २०१५ | एमआय विरूद्ध केकेआर: जिंकणे आवश्यक असलेल्या सामन्यात शेवटच्या ओव्हरमधला बचाव

वानखेडेवर २०१५ मध्ये केकेआरला शेवटच्या ओव्हरमध्ये फक्त १२ धावांची गरज होती. तेव्हा कर्णधार रोहित शर्माने कायरन पोलार्डच्या हातात चेंडू सोपवला. या अष्टपैलू खेळाडूने धोकादायक ठरणाऱ्या युसूफ पठाणला फक्त बादच केले नाही तर त्याने फक्त सहा धावा देऊन पाच धावांनी एमआयला सामना जिंकून दिला. पॉलीने २०१५ मध्ये अविस्मरणीय फलंदाजी केली. त्याने १६३.६७ च्या स्ट्राइक रेटने ४१९ धावा केल्या आणि तेवढेच पुरेसे नव्हते म्हणून त्याने गोलंदाजीतही आपला हात साफ केला.

11. आयपीएल २०१५ | एमआय विरूद्ध सीएसके: आणखी एक अंतिम सामना, सीएसकेविरूद्ध आणखी एक दमदार खेळी

पोलार्डचे आपले पारंपरिक प्रतिनिधी चेन्नई सुपर किंग्सबाबत असलेले प्रेम त्याच्या संपूर्ण करियरमध्ये वेगवेगळ्या प्रकारे दिसून येते. त्याने २०१५ मध्येही २०१३ चा खेळ केला. त्याने १८ चेंडूंमध्ये ३३ धावा करताना तीन चौकार आणि दोन षटकार ठोकले. इनिंगच्या शेवटी अशी धमाकेदार खेळी करून एमआयला २०० चा टप्पा गाठायला मदत केली.

12. आयपीएल २०२० | आरसीबी विरूद्ध एमआय: पाच ओव्हर्समध्ये ९० धावा हव्यात? देऊन टाकल्या.

आयपीएल २०२० मध्ये मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांचा एक रोमांचक सामना झाला. त्याचा निर्णय सुपर ओव्हरमध्ये झाला. एका टप्प्यावर २०२० धावांचा पाठलाग करत असताना रनरेट २० आवश्यक होता. मग तो आला, त्याने पाहिले आणि फक्त २४ चेंडूंमध्ये ६० धावा केल्या. ईशान किशनने ९९ धावा केल्यामुळे सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. 

13. आयपीएल २०१० | त्याचा पहिला सामना!

२०१० मधल्या आयपीएलमध्ये कायरन पोलार्डचा पहिला सामना दिल्ली डेअर डेव्हिल्सविरूद्ध होता. तो पहिल्या इनिंगमध्ये फक्त तीन ओव्हर्स शिल्लक असताना फलंदाजीला आला. त्याने १३ चेंडूंमध्ये ३४६.१५ च्या प्रचंड स्ट्राइक रेटने ४५ धावा केल्या. त्यात सहा षटकारही मारले. त्यानंतर त्याने ४ ओव्हर्समध्ये ०/१५ अशी खेळी करून आपला पहिला सामनावीर पुरस्कार जिंकला. तेव्हाच धोक्याची घंटा वाजली होती!