
१८ व्या आवृत्तीसाठी फक्त १८ दिवस बाकी: आयपीएल २०२५ आली बरं का!
पलटन, आता पुन्हा तो महिना आलाय बरं का!
मार्च महिना सुरू झालाय आणि याचा अर्थ तर तुम्हाला माहीतच आहे. भारताच्या उत्सवाचा आणखी एक सीझन सुरू होतोय! 🏏 काऊंटडाऊन सुरू झालाय, आयपीएलची १८ वी आवृत्ती क्रिकेट जगाला भुरळ पाडण्यासाठी सज्ज आहे. कसा काय जोश? धम्माल!
चहाच्या टपरीवर कटिंग पिताना आपल्या मित्रांसोबत आपापल्या संघाची चर्चा करण्यापासून ते ऑफिसच्या ग्रुपमध्ये खेळणाऱ्या ११ च्या संघाबद्दल वाद घालेपर्यंत, आपला उत्साह शिगेला पोहोचलाय आणि वानखेडेवरच्या सामन्यांसाठी पलटन "आला रे" आणि “मुंबई, मुंबईiiiiii” चा जयघोष करण्यासाठी पलटन सज्ज आहे. 💙
हा विषय फक्त क्रिकेटचा नाहीये तर शब्दांत व्यक्त न होणारी भावना आहे. ब्लू अँड गोल्डमधल्या आपल्या बॉइजना वानखेडेवर चालत येताना बघणे, रोचा नेहमीचा धुडगूस, बोल्ट- बुमरा- चहर यांची धमाल, तूफान गर्दी आणि क्लासिक सामने बघण्याचा रोमांच. हा अनुभव अनुभवण्याचाच आहे.
⚡🥶🔥#MumbaiMeriJaan #MumbaiIndians #TATAIPLAuction pic.twitter.com/UjUjrtZBOL
— Mumbai Indians (@mipaltan) November 26, 2024
… आणि आता आपल्या सर्वांना आयपीएलचे रूटीन कळले आहे. साधारण १२ आठवड्यांचा कालावधी जिथे कामाच्या दिवसांचे नीट नियोजन केल्यानंतर बाकी सगळ्या गोष्टी मागे पडतात. 🤓 मीटिंग्स वेळेत संपतात, मागे पडलेली कामे पटापट पूर्ण होतात आणि संध्याकाळी ६.३० ला सगळे लॉग आऊट होतात म्हणजे होतातच.
आपण सामन्यांच्या आणखी जवळ जातोय तसे आपल्या MI jersey आणि MI Family Membership घेणे आणि तुमचे रोजचे शेड्यूल मॅचच्या वेळांशी जुळते आहे याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. परंतु खरे सांगायचे तर आपण आधीच मनाने तिथे जाऊन पोहोचलो आहोत!
थोडक्यात सांगायचे तर षट्कारांचा पाऊस, धडाझड विकेट्स आणि रेकॉर्ड ब्रेकिंग क्षणांनी भरलेल्या कॅम्पेनचा आनंद घ्यायला तयार व्हा. आपण नव्याने सुरूवात करतोय आणि सहाव्या वेळी ट्रॉफी जिंकण्यासाठी आटोकाट प्रयत्न करणार आहोत. (प्रार्थना तर आधीच सुरू झालीय.😉)