
आशिया कप २०२२- रोमहर्षक सामन्यात पाकिस्तानचा भारतावर विजय
पाकिस्तान क्रिकेट संघाने आशिया कपमध्ये अत्यंत रोमांचक झालेल्या सुपर ४ सामन्यात भारतावर सहा विकेटनी विजय प्राप्त केला.
विराट कोहलीच्या ६० धावांमुळे भारताला १८१/७ चा टप्पा गाठता आला. पाकिस्तानला मोहम्मद रिझवानच्या ७१ धावांमुळे एक चेंडू शिल्लक असताना १८२ धावांचा पाठलाग पूर्ण करता आला.
पाकिस्तानने नाणेफेक जिंकली आणि आधी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार बाबर आझमने मोहम्मद हसनाइनला शाहनवाज दहानीऐवजी आणले. हा एकमेव बदल संघात केला.
भारतासाठी रोहित शर्माने तीन बदल केले. त्याने रवींद्र जाडेजा, अवेश खान आणि दिनेश कार्तिक यांच्याऐवजी हार्दिक पंड्या, दीपक हूडा आणि रवी बिष्णोई यांना आणले.
भारताने पॉवर प्ले टप्प्यात आपल्या इनिंगला आत्मविश्वासपूर्ण सुरूवात करताना ६२/१ धावांची नोंद केली. रोहित शर्मा २८ धावांवर सर्वप्रथम बाद झाला. त्याने हॅरिस रौफचा चेंडू कव्हर पॉइंटकडे फटकावला. तिथे खुशदील शाहने त्याचा कॅच पूर्ण केला.
केएल राहुलने पॉवरप्लेबाहेर खेळलेल्या पहिल्याच चेंडूवर आपली विकेट घालवली. मोहम्मद नवाजने लाँग ऑनवर कॅच घेतली आणि शादाब खानला त्याच्या गोलंदाजीची पहिलीच विकेट मिळवून दिली.
भारताने १०.४ ओव्हर्समध्ये १०० धावा पूर्ण केल्या. परंतु सूर्यकुमार यादव (१३, ९.४ ओव्हर्स), ऋषभ पंत (१४, १३.५ ओव्हर्स) आणि हार्दिक पंड्या (०, १४.४ ओव्हर्स) यांच्यासारखे दिग्गज खेळाडू फलंदाजीच निष्प्रभ ठरले.
विराट कोहलीने ४४ चेंडूंवर ६० धावा फटकावून भारताला १७.१ ओव्हर्समध्ये १५० धावांचा टप्पा पार करून दिला आणि त्यांच्या पहिल्या इनिंगच्या शेवटी १८१/७ च्या पुढे नेऊन सोडले.
रवी बिष्णोईने पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला १४ धावांवर बाद करून सर्वप्रथम विकेट घेतली. बिष्णोईच्या गोलंदाजीने आझमला मिडविकेटवर फटकावण्यास भाग पाडले. परंतु हा चेंडू रोहित शर्माकडे सुरक्षितपणे पोहोचला. रिव्ह्यू घेतल्यानंतरही बाद होण्याचा निर्णय कायम राहिला आणि नो बॉलची शक्यता नाकारली गेली.
पाकिस्तानने आपला पॉवर प्ले टप्पा ४४/१ वर संपवला आणि ६.४ ओव्हर्समध्ये ५० धावा पूर्ण केल्या.
युजवेंद्र चहलने त्या रात्रीचे आपले विकेट्सचे खाते उघडताना सपाट चेंडू टाकला. तो लाँगऑनवर फटकावण्याचा मोह फाखर जमालला आवरला नाही. तिथे उभ्या असलेल्या विराट कोहलीच्या हातात हा कॅच जाऊन विसावला.
मोहम्मद रिझवानच्या अर्धशतकामुळे पाकिस्तानला १२.२ ओव्हर्समध्ये १०० धावा पूर्ण करता आल्या. त्याने मोहम्मद नवाझसोबत (४२) धावांची भागीदारी केली. त्यानंतर नवाझ १५.३ ओव्हर्सवर बाद झाला.
रिझवानची ५१ चेंडूंमध्ये ७१ धावांची अप्रतिम खेली १७ व्या ओव्हरमध्ये संपली. हार्दिक पंड्याच्या स्लो बॉलला पाकिस्तानच्या या फलंदाजाने लाँग ऑफवर टोलवला. परंतु तो सूर्यकुमार यादवने पकडला. हा खेळाची दिशा बदलवणारा क्षण होता.
तीन चेंडूंवर दोन धावांची गरज असताना अर्शदीप सिंगने आसिफ अलीला यॉर्कर टाकून बाद केले.
परंतु, नवीन फलंदाज इफ्तिकार अहमदने विजयी धावा ठोकल्या आणि पाकिस्तानला सहा विकेट्सनी विजय मिळवून दिला.
भारत आशिया कप २०२२ च्या अंतिम फेरीत राहण्यासाठी मंगळवार दिनांक ६ सप्टेंबर रोजी श्रीलंकेचा सामना करेल आणि विजय मिळवायचा प्रयत्न करेल.