चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ वेळापत्रक, #AalaRe!
पलटन, तुम्ही पुन्हा एकदा २०१३ च्या विजयाचा आनंद पुन्हा एकदा घ्यायला तयार आहात का!? 🤩
अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चे वेळापत्रक आले आहे आणि आता आम्ही १९ फेब्रुवारी २०२५ लवकरात लवकर येईल म्हणून प्रतीक्षेत आहोत. हा सगळा काळ क्षणात संपावा असे वाटते, नाही का?
या वेळी १९ दिवसांची ही स्पर्धा लाहोर, रावळपिंडी आणि कराची या तीन पाकिस्तानी शहरांमध्ये होणार आहे. भारतीय क्रिकेट टीमचे सामने संयुक्त अरब अमिरातीतील दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर होतील.
ग्रुप्सबद्दल बोलायचे झाल्यास टीम इंडिया न्यूझीलंड, बांग्लादेश आणि पाकिस्तानसोबत ग्रुप ए मध्ये आहे तर ग्रुप बी मध्ये दक्षिण आफ्रिका, इंग्लंड ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानचा समावेश आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ साठी भारताचे वेळापत्रक
प्रतिस्पर्धी |
टप्पा |
तारीख |
वेळ (आयएसटी) |
बांग्लादेश |
ग्रुप टप्पा |
२० फेब्रुवारी |
दुपारी २.३० वाजता |
पाकिस्तान |
ग्रुप टप्पा |
२३ फेब्रुवारी |
दुपारी २.३० वाजता |
न्यूझीलंड |
ग्रुप टप्पा |
२ मार्च |
दुपारी २.३० वाजता |
|
उपांत्य फेरी* |
४-५ मार्च |
दुपारी २.३० वाजता |
अंतिम* |
९ मार्च |
दुपारी २.३० वाजता |
|
आरक्षित दिवस* |
१० मार्च |
दुपारी २.३० वाजता |
* पात्रतेच्या सापेक्ष
भूतकाळातली आठवण!
मेन इन ब्लूजना आपल्या २०१३ मधील विजयाची पुनरावृत्ती करण्याची आणि ट्रॉफी परत आणण्याची उत्सुकता असेल.
त्या वर्षातील सर्वोत्तम खेळाडूंबद्दल बोलायचे झाल्यास हिटमॅनने पाच सामन्यांमध्ये १७७ धावांसोबत दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोत्तम फलंदाज म्हणून स्वतःचे नाव कोरले. त्याने सलग दोन अर्धशतके नोंदवली.
रोचा माजी ओपनिंग भागीदार असलेला शिखर धवन हा खेळाडू सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला. त्याने ९०.७५ च्या सरासरीने पाच इनिंग्समध्ये ३६३ धावा केल्या.
दरम्यान सर जडेजाने प्रतिस्पर्धी फलंदाजांविरूद्ध जाळे विणले आणि सर्वाधिक विकेट्स घेतल्या. त्याने ३.७५ च्या सरासरीने पाच सामन्यांमध्ये १२ विकेट्स नोंदवल्या.
आधीपेक्षा जास्त जवळ …
चला तर मग पलटन. तारखा जाहीर झाल्या आहेत. संघांची घोषणा लवकरच केली जाईल.
मागच्या वेळी आयसीसीच्या मर्यादित ओव्हर्सच्या सामन्यांत टीम इंडिया खेळली तेव्हा त्यांनी चषक जिंकला होता. लाँग ऑफ... लाँग ऑफ... सूर्यकुमार यादव.
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये अशीच काहीतरी कामगिरी होईल अशी आशा आहे. कमॉन इंडिया, चला करूया!