News

व्हीएचटी २०२४-२५ मध्ये एमआय: श्रीजीतच्या १५० धावांमुळे कर्नाटकला अटीतटीचा पाठलाग पूर्ण करणे शक्य झाले

By Mumbai Indians

विजय हजारे ट्रॉफी २०२४-२५ सुरू आहे आणि आपल्या ब्लू अँड गोल्डमधल्या खेळाडूंनी मैदानात तोडफोड कायम ठेवून विजयी घोडदौड सुरूच ठेवली आहे आणि हेडलाइन्सवर नाव कायम ठेवले आहे.

आता विलंब न करता काय घडते ते पाहूया …

सामन्याचा दिवस १ | २१ डिसेंबर श्रीजीतचा आनंदाचा क्षण!

श्रीजीतभाऊ मर्यादित ओव्हर्स क्रिकेटमध्ये तुझ्या पहिल्यावहिल्या शतकासाठी खूप खूप अभिनंदन!

मुंबई विरूद्ध कर्नाटक सामन्यात हा २८ वर्षीय खेळाडू कर्नाटकच्या संघासाठी ३८२ धावांच्या उत्तुंग डोंगराचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला. त्याने १०१ चेंडूंमध्ये १५० धावा केल्या. त्यात २० चौकार आणि चार षट्कार होते आणि आपल्या संघाला सुंदर विजय मिळवून दिला.

दुसरीकडे सामन्यात पंजाबच्या अश्वनी कुमार (९-०-३७-३) आणि गोव्याच्या अर्जुन तेंडुलकरने (१०-०-६१-३) यांनी आपापल्या टीम्सना विजय मिळवून देण्यासाठी उत्तम गोलंदाजी केली.

पंजाबने अरूणाचल प्रदेशवर नऊ विकेट्सनी विजय मिळवून आपल्या मोहिमेची सुरूवात केली तर गोव्याने स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात ओदिशाचा २७ धावांनी पराभव केला.

सामन्याचा दिवस २| २३ डिसेंबर- मैदानावरील अत्यंत दुर्मिळ दिवस

एमआयच्या प्रतिनिधींनी आपापल्या टीम्ससाठी योगदान दिले. परंतु त्यांना या वेळी फारसे यश मिळाले नाही.

परंतु सूर्यकुमार यादवच्या २३ चेंडूंमधील १८ धावांनी मुंबईच्या हैदराबादवरील निमुळत्या विजयात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली.

काळजी करू नका पोरांनो, काही दिवस असे तर काही तसे असतातच. आता आणखी स्ट्राँग होऊन आगामी सामन्यांमध्ये सर्वोत्तम खेळ करायचा आहे.