#CWC23 फायनल | INDvAUS: चला २००३ चा वचपा काढून करंडक घरी आणूया!
आता वेळ आलीय. तब्बल २० वर्षांची वेदना. २० वर्षांची प्रतीक्षा. २०१९ चा वचपा काढलाय. आता २००३ चा काढायचा बाकी आहे. आता परिस्थितीदेखील बदलली आहे. क्रिकेटच्या महासंग्रामाचा शेवटचा टप्पा बाकी आहे. ब्लू विरूद्ध यलो. भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया, क्रिकेटच्या सर्वांत मोठ्या पंढरीमध्ये आणि १,३२,००० चाहत्यांच्या उपस्थितीत हा सामना होणार आहे.
यातला एक संघ एक नवीन गाथा लिहिणार आहे. एका संघाला सहाव्या विश्वविजेतेपदाची आस आहे तर दुसरा संघ यजमान म्हणून दोन विश्वचषक जिंकणारा पहिलाच संघ ठरेल.
स्पर्धा सुरू होत असताना मेन इन ब्लूकडे प्रचंड आत्मविश्वास आहे. ते ऑसीजविरूद्ध सलग १० सामने नाबाद जिंकल्यानंतर सर्व टप्प्यांवर वर्चस्व ठेवून खेळणार आहेत. त्याचवेळी ऑस्ट्रेलियाने सीडब्ल्यूसी २३ मध्ये आठ सामने जिंकले आहेत आणि ते आपला आठवा विश्चषक अंतिम सामना खेळणार आहेत. त्यातले त्यांनी पाच सामने जिंकलेले आहेत. त्यामुळे हा सामना रथी महारथींचा असेल. अगदी काँटे की टक्कर, अटीतटीचा सामना, तुल्यबळांचा संघर्ष अशी विशेषणंदेखील वापरता येतील, हो ना पलटन?
काय: भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया, आयसीसी क्रिकेट विश्वचषक २०२३ अंतिम सामना
कधी: रविवार दिनांक १९ नोव्हेंबर २०२३
कुठे: नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद.
काय अपेक्षा आहे: एक महासमारोप सोहळा. विश्वचषक विजेत्या कर्णधारांचा सत्कार. रोहित शर्माची देखणी आणि नितांतसुंदर फलंदाजी. हा प्रतिष्ठेचा सामना घरच्या खेळपट्टीवर जिंकण्याचे १.३ अब्ज भारतीयांचे स्वप्न पूर्ण होणार.
आपण काय करायचे आहे: पलटन, हिटमॅन आणि कंपनीसाठी ऊर्जा आणि प्रेरणेचा स्त्रोत व्हा. तुमच्या निळ्या जर्सी आणि प्रेरणादायी गीतांसोबत सज्ज राहा. सामना लाइव्ह पाहा आणि अहमदाबादमध्ये इतिहास कसा पुनरूज्जीवित होतो त्याचे साक्षीदार व्हायला व्हायला विसरू नका.
भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया: आकडेवारी
एकास एक नोंदी (ओडीआय):
खेळलेले: १५०
भारताने जिंकले: ५७
ऑस्ट्रेलियाने जिंकले: ८३
अनिर्णित: १०
बरोबरीत: ०
सर्वाधिक धावसंख्या:
भारत: सचिन तेंडुलकर- ३०७७ धावा.
ऑस्ट्रेलिया: रिकी पॉन्टिंग- २१६४ धावा.
सर्वाधिक विकेट्स:
भारत: कपिल देव – ४५ विकेट्स
ऑस्ट्रेलिया: ब्रेट ली- ५५ विकेट्स
संघ
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, के एल राहुल (उपकर्णधार आणि विकेटकीपर), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमरा, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शामी, रवीचंद्रन अश्विन, ईशान किशन (विकेट कीपर), सूर्यकुमार यादव, प्रसिद्ध कृष्णा (हार्दिक पंड्याचा बदली खेळाडू.)
ऑस्ट्रेलिया: पॅट कमिन्स (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ, एलेक्स कॅरी (विकेट कीपर), जो इंग्लिस (विकेट कीपर), सीन एबॉट, कॅमेरॉन ग्रीन, जो हेझलवूड, ट्राविस हेड, मार्नस लाबुसचेंज, मिश मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टोइनिस, डेव्हिड वॉर्नर, एडम झम्पा, मिशेल स्टार्क.