News

सीमांच्या पलीकडे: मागच्या आयपीएल मेगा ऑक्शन्समध्ये आपण निवडलेले परदेशी खेळाडू

By Mumbai Indians

एका यशस्वी संघासाठी परफेक्ट रेसिपी काय असते? भारतीय सुपरस्टार्स आणि परदेशी टॅलेंट्सनी एकत्र येऊन एकाच ध्येयासाठी प्रयत्न करणं!

आपण सीझनकडे जात असताना परदेशी खेळाडूंची निवड हे एक महत्त्वाचे धोरण आहे. खेळाडूंचे योग्य ते कॉम्बिनेशन टीमसाठी कितीतरी गोष्टी करू शकते.

आता IPL 2025 mega auction जवळच आली असताना परदेशी क्रिकेटपटूंसंदर्भात विद्यमान नियमांमध्ये काही बदल करण्यात आले आहेत.

नवीन नियमांनुसार आगामी मेगा ऑक्शनमध्ये नोंदणी न करणाऱ्या परदेशी खेळाडूला २०२६ च्या संघासाठी मिनी ऑक्शनमध्ये सहभागी होता येणार नाही.

वाचा: IPL 2025 mega auction FAQs

एखाद्या फ्रँचायझीने एखाद्या परदेशी खेळाडूला मेगा ऑक्शनमध्ये निवडले आणि त्यानंतर तो उपलब्ध झाला नाही तर त्याच्यावर पुढच्या दोन सीझनसाठी बंदी घालण्यात येईल.

संबंधित खेळाडूच्या देशांतर्गत बोर्डने त्याला दुखापत झाल्याचे आणि त्यामुळे त्याला विशिष्ट कालावधीसाठी खेळण्यापासून रोखले गेल्याचे प्रमाणित केल्यास त्याला अपवाद केला जाईल.

आपल्या टीमबद्दल बोलायचे झाल्यास आगामी मेगा ऑक्शनमध्ये आपण परदेशी तोफखाना अगदी शून्यातून निवडणार आहोत. आधीच्या मेगा ऑक्शन्समध्ये आपण खरेदी केलेल्या परदेशी खेळाडूंची ही यादी पाहा.

खरेदी केलेले परदेशी खेळाडू- आयपीएल मेगा ऑक्शन्स

वर्ष

खेळाडू

राष्ट्रीयत्व

किंमत

2011

अँड्र्यू सायमंड्स

ऑस्ट्रेलिया

यूएसडी 850,000

डेव्ही जेकब्स

दक्षिण आफ्रिका

यूएसडी 190,000

क्लिंट मकाय

ऑस्ट्रेलिया

यूएसडी 110,000

जेम्स फ्रँकलिन

न्यूझीलंड

यूएसडी 100,000

मोईसेस हेन्रिक्स

ऑस्ट्रेलिया

यूएसडी 50,000

एडेन ब्लिझार्ड

ऑस्ट्रेलिया

यूएसडी 20,000

2014

मायकेल हस्सी

ऑस्ट्रेलिया

रू. 5.00 कोटी

कोरी अँडरसन

न्यूझीलंड

रू. 4.50 कोटी

जोश हेजलवूड

ऑस्ट्रेलिया

रू. 50 लाख

मार्चंट डे लांग

दक्षिण आफ्रिका

रू. 30 लाख

कृष्मार संतोकी

वेस्ट इंडिज

रू. 30 लाख

बेन डंक

ऑस्ट्रेलिया

रू. 20 लाख

2018

कायरन पोलार्ड (आरटीएम)

वेस्ट इंडिज

रू. 5.40 कोटी

पॅट कमिन्स

ऑस्ट्रेलिया

रू. 5.40 कोटी

मुस्तफिजूर रेहमान

बांग्लादेश

रू. 2.20 कोटी

इविन लेविस

वेस्ट इंडिज

रू. 3.80 कोटी

बेन कटिंग

ऑस्ट्रेलिया

रू. 2.20 कोटी

जेसन बेहरेनडॉर्फ

ऑस्ट्रेलिया

रू. 1.50 कोटी

जेपी दुमिने

दक्षिण आफ्रिका

रू. 1.00 कोटी

ताजिंदर धिलाँ

यूएसए

रू. 55 लाख

अकिला धनंजय

श्रीलंका

रू. 50 लाख

2022

टिम डेव्हिड

ऑस्ट्रेलिया

रू. 8.25 कोटी

जोफ्रा आर्चर

इंग्लंड

रू. 8.00 कोटी

डेवाल्ड ब्रेविस

दक्षिण आफ्रिका

रू. 3.00 कोटी

डॅनियल सॅम्स

ऑस्ट्रेलिया

रू. 2.60 कोटी

टायमल मिल्स

इंग्लंड

रू. 1.50 कोटी

रायली मेरेडिथ

ऑस्ट्रेलिया

रू. 1.00 कोटी

फॅबियन एलन

वेस्ट इंडिज

रू. 75 लाख

पलटन, आयपीएल २०२५ मेगा ऑक्शन सुरू होत असताना तुम्हाला १८ व्या स्पर्धेत वन फॅमिलीचा भाग म्हणून कोणत्या परदेशी खेळाडूला पाहायला आवडेल? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा!