News

SAvIND, दुसरा टी२०आय: चक्रवर्तीच्या अप्रतिम खेळानंतरही प्रोटीआजकडून सामन्यात विजय

By Mumbai Indians

दक्षिण आफ्रिकेसाठी आजचा दिवस चांगला गेला. पाहुण्या संघाला सेंट जॉर्ज पार्क, केबेरामध्ये तीन विकेट्सनी पराभव पत्करावा लागला.

टॉसच्या वेळी थोडासा पाऊस झाल्यानंतर आधी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या एडेन मार्क्रमच्या नेतृत्वाखालील संघाने पाहुण्या संघाला परिस्थितीचा पुरेपूर फायदा घेऊन अडचणीत आणले.

वरूण चक्रवर्तीने आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधल्या पाच विकेट्सच्या कामगिरीत धडाधड विकेट्स घेतल्या. पण गेराल्ड कोत्झी आणि ट्रिस्टन स्टब्स यांनी दुसऱ्या इनिंगच्या शेवटी केलेल्या कामगिरीमुळे सामना भारताच्या ताब्यातून निसटला.

हा कमी धावांचा सामना दक्षिण आफ्रिकेच्या बाजूने कसा संपला हे पाहूया.

अगदी सुरूवातीपासूनच टीम इंडियाचा स्ट्रगल

मार्को जेन्सन, गेराल्ड कोत्झी आणि अँदिले सिमेलेन यांच्या जलदगती गोलंदाजीसमोर भारतीय संघाच्या पहिल्या फळीला पॉवर प्लेमध्ये तग धरता आली नाही.

फॉर्ममध्ये असलेला फलंदाज संजू सॅम्सन शून्यावर बाद झाला तर त्यापाठोपाठ अभिषेक शर्मा आणि स्काय बाद झाले. भारतीय संघ ३४/३ वर आला.

तिलक वर्मा आणि अक्षर पटेलचे महत्त्वाचे योगदान

आमच्या तिलक वर्माने डेव्हिडच्या एका हाताच्या जादूमुळे बाद होण्यापूर्वी फक्त २० धावा केल्या.

दरम्यान, अक्षर पटेल २७ धावांवर चांगला खेळत होता. त्याने टीमची नौका स्थिरावण्यासाठी चार चौकार मारले. परंतु, रन आऊटमध्ये तो बाद झाला. त्यामुळे आपल्याला मोठा फटका बसला. १२ ओव्हर्समध्ये धावफलक ७०/५ वर होता.

एचपीच्या चिवट खेळामुळे आपण वाचलो

आपली टीम काळजीत असताना क्रीझवर आलेल्या आपल्या कुंग फू पांड्याने परिपक्व खेळ करून कठीण परिस्थितीत नौका पार लावली. त्याने भारतीय इनिंगला पुन्हा ट्रॅकवर आणले.

आपल्या नाबाद ४५ चेंडूंमधल्या ३९ धावांमध्ये त्याने चार चौकार आणि एक षटकार ठोकला. एचपीने आपल्याकडे पाठलाग करण्यासाठी किमान वाजवी १२४ धावा असतील याची काळजी घेतली.

वरूणचे चक्रव्यूह उपयोगी ठरले नाही...

उजव्या हाताचा स्पिनर वरूण चक्रवर्तीच्या उत्तम खेळामुळे भारताला विजयासाठी लढण्याची संधी दिली. प्रतिस्पर्धी फलंदाज त्याच्या काही मंत्रमुग्ध करणाऱ्या गुगलीजसमोर अतिशय गोंधळात पडले होते.

चक्रवर्तीला मदत केली ती रवी बिष्णोईने. त्याच्या चार ओव्हर्समधल्या १/२१ खेळामुळे प्रतिस्पर्धी संघ शांत राहिला.

परंतु, स्टब्स आणि कोत्झीच्या जोडीने १७, १८ आणि १९ व्या ओव्हरमध्ये एकत्रितरित्या ४० धावा केल्या. त्यामुळे त्यांचा संघ विजयी झाला. टीम इंडिया आणि चाहते त्यामुळे नाराज झाले.

 

थोडक्यात धावसंख्या: भारत २० ओव्हर्समध्ये १२४/६ (हार्दिक पांड्या ३९*, अक्षर पटेल २७; एडेन मार्क्रम १/४) दक्षिण आफ्रिकेकडून तीन विकेट्सनी पराभूत १२८/७ (ट्रिस्टन स्टब्स ४७*; वरूण चक्रवर्ती ५/१७, रवी बिष्णोई १/२१).