News

राईट टू मॅच कार्ड: आयपीएल २०२५ मेगा लिलावात आपला हुकुमाचा पत्ता

By Mumbai Indians

चला तर मग… Retentions locked in. मेगा ऑक्शन मोड = ऑन!

आपले ब्लू अँड गोल्डमध्ये रिटेन केलेले पाच खेळाडू- कुंग फू पांड्या, रो, बूम बूम, सूर्यादाद आणि तिलक भाऊ- यांनी आयपीएल २०२५ च्या जेद्दाह, सौदी अरेबियामध्ये होणाऱ्या मेगा ऑक्शनपूर्वी ४५ कोटी रूपये आपल्या पर्समध्ये ठेवले आहेत.

पण एक मिनिट... आपल्या हातात एक राइट टू मॅच कार्डदेखील आहे. आता पलटन हे विचारेल की आपण आपले महत्त्वाचे आरटीएम कार्ड कोणावर वापरायचे?

मेगा ऑक्शनदरम्यान डायरेक्ट रिटेंशन किंवा आरटीएमद्वारे ठेवता येऊ शकणाऱ्या कॅप्ड आणि अनकॅप्ड खेळाडूंच्या संख्येत हे उत्तर आहे.

वाचा: IPL 2025 mega auction FAQs

आपल्या टीमने पाच कॅप्ड खेळाडू आपल्याकडे ठेवले आहेत. ही प्रत्येक संघात कॅप्ड खेळाडूंची जास्तीत जास्त संख्या आहे. त्यामुळे आता आपल्याकडे अनकॅप्ड खेळाडूची एक जागा शिल्लक आहे. त्यामुळे आरटीएम कार्डचा वापर फक्त एका अनकॅप्ड खेळाडूसाठी करता येईल जो २०२४ मोहिमेत वनफॅमिलीचा भाग होता.

परंतु हे दिसते तितके सोपे नाही. आरटीएम कार्ड वापराच्या नियमात थोडे बदल आहेत. मग आता नवीन नियम काय आहे?

कल्पना करा: २०२४ सीझनमध्ये एक्स फ्रँचायझीचा सदस्य असलेला अ खेळाडू लिलावात आला. त्याला फ्रँचायझी वाय कडून येणारी सर्वोच्च बोली ३ कोटी रूपये असेल.

आता फ्रँचायझी एक्सला ए वर आपल्या आरटीएम कार्डचा वापर करायचा असेल तर फ्रँचायझी वायला त्याची किंमत ७.५ कोटी रूपये असेल. आता, फ्रँचायझी एक्सला तो हवा असेल तर त्यांनी आपल्या आरटीएमचा वापर करून खेळाडू अ ला ७.५ कोटी रूपयांत खरेदी करावे सागेसस. अन्यथा तो फ्रँचायझी वायकडे ७.५ कोटी रूपयांमध्ये जाईल.

मुक्त केलेल्या अनकॅप्ड खेळाडूंची यादी

नाव

भूमिका

टी२० सामने

धावा

विकेट्स

हार्विक देसाई

विकेट कीपर फलंदाज

27

691

 

आकाश मधवाल

गोलंदाज

41

 

46

अंशुल कंबोज

अष्टपैलू

15

26

17

अर्जुन तेंडुलकर

गोलंदाज

21

 

26

कुमार कार्तिकेय

गोलंदाज

31

 

32

नमन धीर

फलंदाज

12

179

 

नेहल वढेरा

फलंदाज

31

577

 

पियूष चावला

गोलंदाज

295

 

315

शम्स मुलाणी

अष्टपैलू

45

187

52

श्रेयस गोपाळ

अष्टपैलू

97

471

110

शिवालिक शर्मा

फलंदाज

10

114

 

विष्णू विनोद

विकेट कीपर फलंदाज

61

1,591

 

आरटीएम कार्डद्वारे रिटेन केला जाणारा तुमचा आवडता खेळाडू कोणता? आम्हाला कमेंट्समध्ये सांगा!