News

SAvIND, तिसरा टी२०आय: २-१!! टीव्हीचा क्लासिक खेळ आणि एक नाट्यमय विजय

By Mumbai Indians

हा एक नवीन दिवस आहे आणि टीम इंडियासाठी एक नवीन शतकवीरदेखील!

ब्लू अँड गोल्डमधला आपला शायनिंग स्टार, तिलक वर्मा टी२०आयमध्ये भारतीय शतकवीरांच्या पंगतीत जाऊन बसलाय. त्याने ५६ चेंडूंमध्ये नाबाद १०७ धावा केल्या आणि भारताला २१९/६ पर्यंत पोहोचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

त्यानंतर यजमान संघाने हेन्रिच क्लासेन आणि मार्को जेन्सनच्या अप्रतिम खेळामुळे दणदणीत विजय मिळवला. सूर्यकुमार यादवखालील टीमने २-१ ची आघाडी घेऊन मालिकेच्या शेवटच्या टप्प्यात प्रवेश केला.

भारतीय क्रिकेट टीमच्या विजयी संध्येची उजळणी करूया!

अभिषेक आणि तिलक... आल्याबरोबर दणदणीत सुरूवात!

संजू सॅम्सन सलग दुसऱ्या सामन्यात शून्यावर बाद झाल्यानंतर अभिषेख शर्मा आणि तिलक वर्मा यांनी खेळाचा ताबा घेऊन प्रोटीआजच्या गोलंदाजांना अंगावर घेतले.

टीव्हीने पहिल्याच ओव्हरमध्ये एक चौकार आणि एक षटकार ठोकला. त्याचा डावखुरा जोडीदार त्याच्यासोबत सहभागी झाला. त्याने दुसऱ्या ओव्हरमध्ये १५ धावा करताना काही अप्रतिम शॉट्स मारले.

या दोघांनीही संपूर्ण पहिल्या सहा ओव्हर्समध्ये आक्रमक खेळ सुरूच ठेवला. त्यांनी टीमला ७०/१ पर्यंत पोहोचवले. त्याने पाच चौकार आणि तेवढेच षटकार ठोकले.

धावा थांबल्याच नाहीत

अभिषेक शर्माने पॉवरप्लेनंतर लगेचच आत्मविश्वासाने परिपूर्ण अर्धशतक झळकवले. त्याने २०० च्या स्ट्राइक रेटने २५ चेंडूंमध्ये ५० धावा केल्या.

तो बाद झाल्यानंतर लगेचच आपल्या एचपी आणि टीव्हीने इनिंगदरम्यान धावांचा दर १० च्या वर ठेवला. १० ओव्हर्सच्या शेवटी धावफलक ११०/३ वर होता.

जहाँपनां, तुस्सी ग्रेट हो, सेंच्युरी कबूल करो!

आजचा दिवस आपला तिलक वर्मा संपूर्ण आयुष्यभर लक्षात ठेवेल.

एका शहाण्या माणसाने एकदा सांगितलं होतं,यशाच्या मागे धावू नका. एक्सलन्सच्या मागे धावा. यश तुमच्या पायाशी लोळण घेईल!”… आपल्या २२ वर्षांच्या सुपरस्टारने केलेल्या अप्रतिम खेळाला हे लागू होतं, नाही का पलटन?

वरच्या फळीत मिळालेल्या प्रमोशनचा पुरेपूर फायदा उचलून त्याने पहिल्या चेंडूपासूनच आपला हेतू स्पष्ट केला. त्याने दणदणीत ५६ चेंडूंमध्ये नाबाद १०७ धावा करताना अजिबात हार मानली नाही. त्यामुळे टीम इंडियाला आणखी एक २१९/६ ची धावसंख्या उभारणे शक्य झाले.

या प्रक्रियेत डावखुरा फलंदाज भारताचा दुसऱ्या क्रमांकाच सर्वांत तरूण टी२०आय शतकवीर ठरला. त्याने आपल्या टीमला २०२४ मध्ये सामन्याच्या सर्वांत छोट्या स्वरूपात आठवी २००+ धावसंख्या उभारून दिली. एका कॅलेंडर वर्षात कोणत्याही टीमने उभारलेली ही सर्वाधिक धावसंख्या होती!

अँट-रप्शनसाठी सॉरी!

धावांच्या पाठलाग सुरू झाल्यानंतर पहिल्याच ओव्हरमध्ये मैदानावर मुंग्या उडत आल्या. त्यामुळे सामना थोडा थांबवावा लागला.

सामना साधारण २० मिनिटांनंतर परत सुरू झाला. अर्शदीप सिंगने धोकादायक दिसणाऱ्या रायन रिकेल्टनला दुसऱ्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर बाद केले.

विजयी झालेला पाहुणा संघ!

दक्षिण आफ्रिकेसाठी वेळोवेळी विकेट्स पडत राहिल्या. ते १० ओव्हर्समध्ये ८४/४ वर होते. आवश्यक असलेल्या १३.६० च्या रेटपेक्षा हा रेट खूप कमी होता.

त्याचा परिणाम म्हणून हेन्रिच क्लासेन- डेव्हिड मिलर या दोघांनी ५८ धावांची भागीदारी केली. अक्षर पटेलने अगदी सीमारेषेजवळ जाऊन प्रतिम कॅच घेतला आणि मिलर बाद झाला.

अष्टपैलू मार्को जेन्सनच्या १७ चेंडूंमधल्या ५४ धावांच्या मनोरंजक खेळामुळे भारताला भीती निर्माण झाली. प्रोटीआज त्यामुळे विजयाच्या थोडे जवळ आले.

तथापि, अर्शदीप सिंगने शेवटच्या ओव्हरमध्ये २४ धावांचा बचाव केला आणि टीम इंडियाला शेवटच्या ओव्हरमध्ये रोमांचक खेळात विजयी करण्यास मदत केली.

 

थोडक्यात धावसंख्या: भारत २१९/६ २० ओव्हर्समध्ये (तिलक वर्मा १०७*, अभिषेक शर्मा ५०; अंदिले सिमेलेन २/३४) कडून दक्षिण आफ्रिकेचा ११ धावांनी पराभव २० ओव्हर्समध्ये २०८/७ (मार्को जेन्सन ५४; अर्शदीप सिंग ३/३७, वरूण चक्रवर्ती २/५४).