News

मुंबई इंडियन्सकडून एमआय ज्युनियर 2025 पाचव्या हंगामाची मुंबईत सुरुवात

By Mumbai Indians

मुंबई इंडियन्सने त्यांच्या स्पोर्ट्स फॉर ऑल (ईएसए) उपक्रमांतर्गत एमआय ज्युनियर आंतर-शालेय क्रिकेट स्पर्धेच्या पाचवी आवृत्तीची मुंबई शहरात सुरुवात केली. ही स्पर्धा मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए) आणि विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या (व्हीसीए) संयुक्त विद्यमाने आयोजित केली जात आहे. नागपूर लेग पुढील आठवड्यात सुरू होणार आहे. एमआय ज्युनियरच्या मागील हंगामांमुळे महाराष्ट्रातील नवोदित क्रिकेटपटूंसाठी मुंबई, पुणे आणि नागपूर या शहरांमध्ये प्रतिष्ठित ठिकाणी दर्जेदार स्पर्धा आयोजित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या स्पर्धेत 14 वर्षांखालील मुले आणि मुली, 15 वर्षांखालील मुली आणि 16  वर्षांखालील मुलांचा सहभाग असेल. माटुंगा जिमखाना येथे मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत बुधवारी उद्घाटन सोहळा पार पडला.

या आवृत्तीसाठी प्रमुख ठळक वैशिष्ट्ये आणि नवीन भर म्हणजे ‘एमआय ज्युनियर रायझिंग स्टार्स’ हा टप्पा आहे, जो नियमित स्पर्धेच्या टप्प्याचे अनुसरण करेल. नियमित हंगाम संपल्यानंतर मुले आणि मुलींच्या गटातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंना एमआय ज्युनियर रायझिंग स्टार्स्रच्या टपप्यात सहभागी करून घेतले जाईल. स्पर्धेच्या दुसर्‍या टप्प्यात मुलांच्या गटात 4 संघ आणि मुलींच्या गटात 2 संघ असतील, जे एमआय ज्युनियर 2025 हंगामातील खेळाडूंच्या कामगिरीच्या आधारे निवडले जातील.

दरवर्षी प्रमाणे, एमआय ज्युनियर स्पर्धेतील  विजेत्यांना मुंबई इंडियन्सच्या सपोर्ट स्टाफसोबत त्यांच्या क्रिकेट प्रवासाच्या पुढील स्तरासाठी एक्सपोजर, कौशल्ये वाढवण्यासाठी आणि त्यांना तयार करण्यासाठी डिझाइन केलेल्या प्रशिक्षण सत्रात सहभागी होण्याची संधी मिळेल.

स्पोर्ट्स फॉर ऑल (ईएसए) उपक्रमांतर्गत तळागाळातील विकासासाठी रिलायन्स फाऊंडेशनने(रिलायन्स इंडस्ट्रिज लिमिटेडची सीएसआर शाखा) हाती घेतलेल्या अनेक उपक्रमांपैकी एमआय ज्युनियर हा एक उपक्रम आहे. खेळ आणि शिक्षणाद्वारे तरुणांना संधी निर्माण करणे आणि प्रेरणा देणे हा त्यांचा उद्देश आहे.

एमआय ज्युनियरच्या पाचव्या हंगामातील पहिल्या दिवशी, 15 वर्षांखालील मुलींच्या गटात गतविजेत्या दादर येथील शारदाश्रम विद्यामंदिरने सांघिक कामगिरीच्या जोरावर डोंबिवली येथील सिस्टर निवेदितावर सहज विजय मिळवला. शारदाश्रम विद्यामंदिरने प्रतिस्पर्ध्यांचे 81 धावांच्या लक्ष्य अवघ्या 8 षटकांत पार केले.

वैदेही तानावडेने फटकेबाजी करत 7 चौकारांसह 38 धावा करताना एकतर्फी विजयावर शिक्कामोर्तब केले. कार्तिक पुजारीने 20 धावा करताना तिला सुरेख साथ दिली. त्यापूर्वी, अचूक मारा करताना अष्टपैलूत्व सिद्ध केले. तत्पूर्वी, सिस्टर निवेदिता संघ केवळ 80 धावा करू शकला. त्यांच्याकडून स्वरा सुर्वेने सर्वाधिक 28 धावा केल्या.