
मला खात्री आहे की आपण यातून सावरू शकतोः आकाश अंबानी यांचा टीमवरील अढळ विश्वास
आरसीबीविरूद्ध सामन्यात हार झाल्यामुळे ड्रेसिंग रूममध्ये वातावरण बरेसचे निराश होते.
परंतु आकाश अंबानी यांच्या प्रेरणादायी भाषणाने टीमचे मनोबल उंचावले.
“सर्वप्रथम, मला सर्वांना सांगायचे आहे की तुम्ही मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधित्व करत आहात. त्यामुळे तुमची मान कायम उंच असली पाहिजे. आपण यापूर्वीही कठीण परिस्थितीत होते आणि आपण त्यातून सावरू शकतो. माझा एक संघ म्हणून, ११ खेळाडू म्हणून तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे,” आकाश अंबानी म्हणाले.
त्यांनी वैयक्तिकरित्या आणि एकत्रितरित्या मेहनतीच्या महत्त्वावरही भर दिला.
“आपल्या सर्वांना माहीत आहे की आपल्याला खूप मेहनत करावी लागणार आहे. मी विनंती करतो की तुम्ही वैयक्तिकरित्या तर मेहनत कराच पण एक टीम म्हणूनही करा,” ते म्हणाले.
आपल्याला लवकरच पहिला विजय मिळेल याची आकाश अंबानी यांना खात्री होती.
“सर्वांना नक्कीच खूप वाईट वाटत असेल. परंतु आपण सर्वजण ही ऊर्जा एकत्र आणून मैदानावर सर्वोत्तम कामगिरी देऊ शकतो आणि विजय प्राप्त करू शकतो. मला त्याची खात्री आहे आणि मला शेवटी हे सांगायचे आहे की, माझा आमच्या सर्व खेळाडूंवर संपूर्ण विश्वास आहे. मला खात्री आहे की आपण या परिस्थितीतून नक्कीच बाहेर येऊ,” आकाश अंबानी शेवटी म्हणाले.
आमचा संघ या १३ एप्रिल रोजी पुण्यातील एमसीए स्टेडियमवर पंजाब किंग्सविरूद्ध या प्रोत्साहनाला कशा प्रकारे प्रतिसाद देतो हे पाहायला आम्ही उत्सुक आहोत.