माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहेः मिसेस नीता अंबानी यांनी संघाचं मनोबल उंचावलं
टाटा आयपीएल २०२२ मध्ये आरसीबीविरूद्ध सामना हरल्यामुळे संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये निराशेचे वातावरण होते.
मिसेस नीता अंबानी यांनी टीमशी फोनवर संपर्क साधला आणि त्यांना दिलासा देऊन त्यांचे मनोबल उंचावले.
“माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि मला खात्री आहे की आपण यातून नक्कीच बाहेर पडू. आता आपण फक्त पुढेच जाणार आहोत आणि प्रगती करणार आहोत. आपण स्वतःवर विश्वास ठेवणार आहोत की आपण यावर मात करू शकू,” मिसेस नीता अंबानी फोनवर म्हणाल्या.
त्यांनी टीमला याही गोष्टीची आठवण करून दिली की यापूर्वीदेखील हे घडलेले आहे आणि आपण त्यातून खूप चांगली कामगिरी करून बाहेर पडलो आहोत.
“आपण पराभवाचा सामना यापूर्वी अनेकदा केला आहे. त्यानंतरही आपण कप जिंकलेला आहे. त्यामुळे मला पूर्ण विश्वास आणि खात्री आहे की तुम्ही एकमेकांसोबत राहिलात, तुम्ही एकमेकांच्या पाठीशी उभे राहिलात तर तुम्ही या परिस्थितीवर विजय प्राप्त करू शकता. मी तुमच्यासोबत कायम आहे,” असे त्या म्हणाल्या.
मिसेस नीता अंबानी यांनी खेळाडूंना स्वतःवर आणि एकमेकांवर विश्वास ठेवण्याचे आवाहन केले.
“स्वतःवर विश्वास ठेवा आणि एकमेकांवर विश्वास ठेवा. एकमेकांची साथ सोडू नका. मुंबई इंडियन्स कायमच तुम्हाला पाठिंबा देईल,” त्या म्हणाल्या.
मिसेस नीता अंबानी यांच्या या प्रेरणादायी शब्दांमुळे संघाला प्रोत्साहन मिळाले आहे, अशी आशा आहे. आता आम्ही १३ एप्रिल रोजी पुण्यातील एमसीए स्टेडियमवर पंजाब किंग्ससोबत सामन्यासाठी तयारी करतोय.