News

भारताचा १-० ने पराभव? हरकत नाही! आपण इथून पुन्हा उसळी मारू शकतो …

By Mumbai Indians

भारतीय क्रिकेट संघ २०१२ पासून घरच्या खेळपट्टीवर तुफानी कामगिरी करत आला आहे. परंतु आपल्याला या वेळी भारतीय उपखंडात झालेल्या कसोटी मालिकेत पराभव पत्करावा लागलाय.

नोव्हेंबर- डिसेंबर २०१२ मध्ये इंग्लंडविरूद्ध झालेल्या २-१ ने पराभवात टीम इंडियाच्या वर्चस्वाचा पाया रचला. तेव्हापासून आपण घरच्या खेळपट्टीवर तब्बल १८ मालिका जिंकल्या आहेत. हा एक विक्रमच आहे.

न्यूझीलंडच्या २०२४ मधल्या भारताच्या दौऱ्यात रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघ १-० ने पिछाडीवर पडला. आपण विजयी होण्याचा पूर्ण प्रयत्न केला. परंतु हे शक्य झाले नाही.

हरकत नाही. आपल्या अप्रतिम विक्रमाचा विचार करता घरच्या खेळपट्टीवर आपण नक्कीच विजयी होऊ. आपण यापूर्वीही हे केलेले आहे.

भारताने मालिकेतील पहिल्या सामन्यात पराभव पत्करल्यानंतर पुन्हा विजयी वारूवर स्वार झाल्याच्या २०१२ पासूनच्या घटना पाहूया.

बॉर्डर- गावस्कर ट्रॉफी २०१७ (२-१ विजय)

दर वर्षीची ही बहुप्रतीक्षित द्विसंघीय मालिका आहे, नाही का? भारतीयांसाठी हा फक्त भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान सामना नाही तर ही एक भावना आहे.

या मालिकेतल्या पहिल्या सामन्यात ऑसीजनी पुण्यातल्या एमसीए स्टेडियमवर ३३३ धावांनी विजय मिळवला. स्टीव्ह स्मिथच्या नेतृत्वाखालील संघाने जराही हार मानली नाही. त्यांनी भारतीय संघाला संपूर्ण स्पर्धेत पिछाडीवरच ठेवले.

त्यानंतर जे घडले ते टीम इंडियाची आपल्या मैदानात ताकद दाखवणारे होते.

एक लढाऊ बाण्याचा ७५ धावांचा विजय, सामनापटू केएल राहुल (९० आणि ५१) आणि रवीचंद्रन अश्विन (२/८४ आणि ६/४१) यांनी दोन सामने शिल्लक असताना संतुलन पुन्हा प्राप्त करून दिले.

तिसऱ्या सामन्यात प्रचंड प्रमाणात धावा केल्या गेल्या. परंतु हा सामना अनिर्णित राहिला. या सामन्यात तीन शतकवीर (स्टीव्ह स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल आणि वृद्धिमान साहा) आणि एक द्विशतकवीर (चेतेश्वर पुजारा) ठरले. या मालिकेतील धर्मशाला येथील चौथा आणि शेवटचा सामना भारताच्या बाजूने लागला. आपण अगदी सहजपणे आठ विकेट्सनी विजय मिळवला.

अष्टपैलू रवींद्र जडेजाला चार सामन्यांमध्ये २५ विकेट्स घेतल्यामुळे मालिकापटू म्हणून गौरवण्यात आले.

भारताचा इंग्लंड दौरा २०२१ (३-१ विजयी)

इंग्लंडविरूद्ध या मालिकेपूर्वी पाच मालिकांमध्ये विजय मिळाल्यानंतर २०२१ मध्ये चार सामन्यांची मालिकेत बरोबरीत सुटली तेव्हा भारतीय टीमकडे जिंकण्याची संधी होती.

परंतु, पाहुण्या संघाने पहिल्या इनिंगमध्ये कर्णधार जो रूटच्या द्विशतकी खेळीमुळे (२१८) तब्बल २२७ धावांनी विजय मिळवून सकारात्मक सुरूवात केली.

त्यानंतर टीम इंडियाने चेपॉकवर दणदणीत ३१७ धावांनी विजय मिळवून प्रतिसाद दिला. आमचा मुंबईचा राजा रोहित शर्मा याने १६१ धावांची उत्तम खेळी केली तर आपला हिरो अश्विनला शतक फटकावण्यासाठी आणि चार दिवसांत आठ विकेट्स घेण्यासाठी सामनापटूचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

तिसरी आणि चौथी कसोटी या भारताच्या घरच्या खेळपट्टीवरील अद्वितीय वर्चस्वाचे आणखी एक उदाहरण होत्या. १० विकेट्स आणि एक इनिंग आणि २५ धावांनी मिळालेल्या दोन विजयांनी आपल्या संघाला ३-१ ने मालिकेत विजय मिळवून दिला.

एश अन्नाला ३२ विकेट्समुळे मालिकापटूचा पुरस्कार देण्यात आला.

भारताचा इंग्लंड दौरा २०२४ (४-१ विजय)

रोहित शर्माच्या कर्णधारपदाअंतर्गत हा टीम इंडियाचा पहिला सामना होता. परंतु आपल्या हिटमॅनने अत्यंत स्टाइलमध्ये या वर्षाच्या सुरूवातीला ब्रिटिश संघावर ४-१ ने विजय मिळवला.

मालिकेतल्या पहिल्या सामन्यात २८ धावांच्या निसटत्या विजयानंतर इंग्लंडला अपेक्षाच नव्हती की भारतीय संघ चार विजय घेऊन परतेल. पण नेमके हेच घडले!

बूम बूमच्या देखण्या खेळामुळे (६/ ४५ आणि ३/४६) दुसऱ्या सामन्यात प्रतिस्पर्धी संघाला पूर्ण उधळून लावले. सर रवींद्र जडेजा यांच्या तिसऱ्या सामन्यातील अष्टपैलू कामगिरीमुळे भारतीय संघाला १०६ धावा आणि ४३५ धावांनी विजय मिळवून २-१ आघाडी घेता आली. 

रोच्या संघाने रांची येथे पाच विकेट्सनी विजय मिळवून मालिकेवर विजयाचे शिक्कामोर्तब केले. धर्मशाळामधला शेवटचा सामना फारसा महत्त्वाचा ठरला नाही कारण आपण या सामन्यात पूर्ण वर्चस्व गाजवले.

रोहितच्या पहिल्या इनिंगमधल्या अप्रतिम शतकामुळे एक इनिंग आणि ६४ धावांनी विजय मिळाला आणि आपण ही मालिका खिशात टाकली.