News

चला आपल्या मुकुटाचं रक्षण करूयाः SAvIND टी२०आय आणि बीजीटीसाठी संघांची घोषण

By Mumbai Indians

आयसीटीच्या चाहत्यांसाठी क्रिकेटच्या एक्शनमध्ये जराही कमी नाहीये कारण SAvIND टी२०आय मालिका सध्या सुरू असलेली INDvNZ कसोटी आणि त्यानंतर लगेचच बहुप्रतीक्षित बॉर्डर गावस्कर ट्रॉफी २०२४-२५ संपल्यानंतर लगेचच सुरू होणार आहे.

भारताच दक्षिण आफ्रिक २०२४ दौऱ्यासाठी संघ

आगामी चार सामन्यांची टी२०आय मालिका ८ नोव्हेंबर रोजी सुरू होणार आहे. यात सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील संघात काही नवीन चेहरे दिसतील जे आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला पहिलाच सामना खेळणार आहेत.

जलदगती गोलंदाज विजयकुमार व्यशक आणि आपला माजी स्टार रमणदीप सिंग यांना त्यांच्या पहिल्या सीनियर टीममध्ये खेळण्याची संधी देण्यात आली आहे. रमणदीपने एसीसी टी२० इमर्जिंग टीम्स एशिया कप २०२४ मध्ये अप्रतिम खेळ करून निवड समितीचे लक्ष वेधून घेतले.

संजू सॅम्सन आणि वरूण चक्रवर्ती या दोघांनी अलीकडेच झालेल्या बांग्लादेशविरूद्धच्या टी२०आय मालिकेत सर्वाधिक धावा आणि विकेट्स घेतल्या आहेत. ते आता आपला हाच फॉर्म कायम ठेवण्यासाठी प्रयत्नशील असतील. 

परंतु रियान पराग, शिवम दुबे आणि मयंक यादव या तिघांना दुखापतींमुळे दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्याला मुकावे लागेल.

भारताचा दक्षिण आफ्रिकेविरूद्ध चार टी२०आय सामन्यांसाठी संघः सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅम्सन (विकेट कीपर), रिंकू सिंग, तिलक वर्मा, जितेश शर्मा (विकेट कीपर), हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, रमणदीप सिंग, वरूण चक्रवर्ती, रवी बिष्णोई, अर्शदीप सिंग, विजयकुमार व्यशक, आवेश खान, यश दयाल.

बॉर्डर गावस्कर ट्रॉफी २०२४-२५ संघ

दरम्यान आमचा रोच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट टीम ऑसीजचा त्यांच्या घरच्या खेळपट्टीवर सामना करतील आणि बीजीटी पाचव्या वेळी जिंकण्यासाठी आटोकाट प्रयत्न करेल.

बूम बूम सलग दुसऱ्या मालिकेसाठी आपल्या हिटमॅनसाठी उपकर्णधार म्हणून काम करेल.

दुर्दैवाने वेळेत फिट होण्याची अपेक्षा असलेला मोहम्मद शामी आपल्या घोट्याला झालेल्या दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर झाला आहे. मागच्या वर्षीच्या ओडीआय वर्ल्ड कपपासून याच दुखापतीमुळे तो बाहेर राहिला आहे. स्पिनर कुलदीप यादवदेखील जांघेच्या दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर झाला आहे.

याशिवाय हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी आणि अभिमन्यू ईश्वरन हे तीन अनकॅप्ड खेळाडू १८ सदस्यांच्या टीमचा भाग म्हणून परदेशी प्रवास करतील.

INDvNZ मालिकेच्या दुसऱ्या सामन्यात ११ विकेट्स घेणाऱ्या वॉशिंग्टन सुंदरने आपल्या कसोटी टीममधील प्रवेशाची घोषणा दणक्यात केली आहे आणि त्याला लवकरच बीजीटी संघातही खेळता येईल.

बॉर्डर गावस्कर ट्रॉफी २०२४-२५ साठी भारतीय संघ- रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमरा (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, अभिमन्यू ईश्वरन, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (विकेट कीपर), सरफराज खान, ध्रुव जुरेल (विकेट कीपर), रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर.