INDvENG, ओडीआय पूर्वावलोकनः चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दृष्टीने अंतिम तयारी
पलटन, आता पुढच्या महिनाभरासाठी ओडीआय मोडवर येऊया! <कारण नंतर आपला सण सुरू होणार आहे, #IYKYK> 😌
भारतीय क्रिकेट टीमने अलीकडेच झालेल्या इंग्लंडविरूद्धच्या टी२०आय मालिकेत ४-१ ने दणदणीत विजय मिळवला. आता खेळाच्या दीर्घ स्वरूपात आपला फॉर्म तपासायला ते सज्ज आहेत.
अप्रतिम आयसीसी ओडीआय वर्ल्ड कप २०२३ (अंतिम सामन्यातला पराभव वगळता) पासून टीम इंडियाने ५० ओव्हरच्या स्वरूपात फक्त दोन मालिका खेळल्या आहेत आणि त्या दोन्ही भारताबाहेर खेळवल्या गेल्या.
डिसेंबर २०२३ मधील दक्षिण आफ्रिकेचा दौरा आपण २-१ ने जिंकलो तर ऑगस्ट २०२४ मध्ये श्रीलंकेविरूद्ध तीन सामन्यांच्या मालिकेत पहिला सामना बरोबरीत सुटल्यानंतर श्रीलंकन संघ २-०ने विजयी ठरला.
आयसीसी वर्ल्ड कप २०२३ नंतर खेळाडूंना ओडीआय फारसे खेळायला मिळाले नसल्यामुळे हे तीन सामने रोहित शर्मा आणि कंपनीला आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या महत्त्वाच्या मालिकेपूर्वी आपल्यासाठी योग्य कॉम्बिनेशन ठरवणे तसेच आपला संघ सज्ज करण्यासाठी उपयुक्त ठरतील.
आगामी मालिकेबद्दल बोलायचे झाल्यास दोन्ही संघ ओडीआयमध्ये आमनेसामने येण्याची आयसीसी वर्ल्ड कप २०२३ लीग टप्प्यानंतरची ही पहिलीच वेळ आहे.
तो सामना आपण तब्बल १०० धावांनी जिंकलो आणि आपण खूप धावा केला. त्यात आपल्या रोला सामनापटूचा पुरस्कार देण्यात आला आणि त्याने त्यात दोन टप्पे पार केले! 💪
𝙸𝙽𝙲𝚁𝙴𝙳𝙸𝙱𝙻𝙴 𝐇𝐈𝐓𝐌𝐀𝐍 🔥
— Mumbai Indians (@mipaltan) October 29, 2023
Some milestones ✅ on his way to 87#OneFamily #CWC23 #INDvENG @ImRo45 pic.twitter.com/ix07NzF3mA
या मालिकेतील भारतीय संघाबद्दल जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा – TAP HERE!
दरम्यान इंग्लंडच्या संघात वर्ल्ड कप २०२३ मध्ये खराब कामगिरी झाल्यानंतर ओडीआयमध्ये प्रथमच जो रूटला खेळवले जाईल कारण इंग्लंडच्या न्यूझीलंड दौरा २०२४ दरम्यान बेन स्टोकला मांडीला झालेली इजा अद्याप बरी झालेली नाही.
Breaking squad news! 🚨
— England Cricket (@englandcricket) December 22, 2024
Our squads to tour India and for the Champions Trophy! 📝
Click below for the details 👇
**********
काय: भारत विरूद्ध इंग्लंड, तीन सामन्यांची ओडीआय मालिका.
कधी आणि कुठे:
पहिला ओडीआय: गुरूवार, ६ फेब्रुवारी (नागपूर)
दुसरा ओडीआय: रविवार, ९ फेब्रुवारी (कटक)
तिसरा ओडीआय: बुधवार १२ फेब्रुवारी (अहमदाबाद)
काय अपेक्षा आहे: निवांत बता आणि “मेन कोर्स” पूर्वी “स्टार्टर्स”चा आनंद घ्या. 😉
बहुप्रतीक्षित आयसीसी मालिकेपूर्वी ही शेवटची मालिका म्हणजे एकही टीम त्याला हलक्यात घेणार नाही. त्यामुळे सामन्यातल्या उत्तम कामगिरीसह चटकदार क्षणांचा आनंद घ्यायला तयार राहा!
भारत विरूद्ध इंग्लंडः आकडेवारी
ओडीआयमध्ये एकास एक आकडेवारी |
||
भारत |
संघ |
इंग्लंड |
१०७ |
सामने |
१०७ |
५८ |
विजयी |
४४ |
४४ |
पराभूत |
५८ |
३ |
अनिर्णित |
३ |
२ |
बरोबरीत |
२ |
एमएस धोनी (१५४६ धावा) |
सर्वाधिक धावा |
इयान बेल (११६३ धावा) |
रवींद्र जडेजा (३९ विकेट्स) |
सर्वाधिक विकेट्स |
जेम्स अँडरसन (४० विकेट्स) |