
#INDvBAN पूर्वावलोकनः जखमी भारताला २०११ च्या पुनरावृत्तीची आशा
प्रत्येक काळ्या ढगाला एक सोनेरी किनार असते. तसेच भारताच्या दक्षिण आफ्रिकेविरूद्ध अगदी शेवटच्या ओव्हरमध्ये झालेल्या पराभवाने दुःखी झालेल्या भारतीय चाहत्यांनाही वाटतेय. २०११ चा प्रभाव अजून दिसतो आहे आणि ११ वर्षांनंतर प्रोटीआजच्या संघाने आपल्या विजयी वारूला खीळ घातली आहे. २०११ मध्ये काय झाले हे आपल्याल माहीत आहे. २०११ मध्ये काय झाले हे संपूर्ण जगाला माहीत आहे.
२०११ मध्येदेखील भारत दक्षिण आफ्रिकेविरूद्ध सामना हरला होता. पण त्यापूर्वी त्यांनी इंग्लंडविरूद्ध रोमांचक सामना खेळून हरवले होते आणि नेदरलँड्सलाही घरचा रस्ता दाखवला होता. आता २०२२ मध्ये भारतीय संघाने पाकिस्तानविरूद्ध अटीतटीचा सामना जिंकला आहे, डच खेळाडूंना जखमी केले आहे आणि तरीही आता जिंकलेच पाहिजे अशा परिस्थितीत ते आहेत. महत्त्वाचे म्हणजे अष्टपैलू खेळाडूऐवजी अतिरिक्त फलंदाज खेळवणे आणि गोलंदाजी करताना स्पिन डेथ ओव्हर्ससाठी सोडण्याचे धोरण रोहित आणि कंपनीसाठी घातक ठरले आहे. त्यांना हा धडा मिळाला आहे.
तेव्हा भारतीय संघासमोर चार सामने होते. आताही भारतीय संघाला अजून चार सामने खेळायचे आहेत. त्या वेळी याच टप्प्यावर सुरेश रैना ११ च्या संघात आला आणि मधल्या फळीला त्याने आवश्यक असलेला आकार दिला. आता दिनेश कार्तिक दुखापतग्रस्त झाल्यामुळे बाहेर राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऋषभ पंत भारतीय संघाचे टॉनिक ठरू शकतो.
बांग्लादेशचीही अवस्था फारशी वेगळी नाही. त्यांनी दोन सामने थोडक्यात जिंकलेत आणि एक सामना धडाक्यात हरला आहे. एकास एक रेकॉर्ड खूप चांगले असले तरी भारताला त्यांना हलक्यात घेणे परवडणारे नाही.
आकडेवारी |
भारत |
बांग्लादेश |
टी२०आयमध्ये एकास एक |
१० विजय |
१ विजय |
टी२० वर्ल्ड कपमध्ये एकास एक |
३ विजय |
० विजय |
सर्वाधिक धावा करणारा फलंदाज |
रोहित शर्मा (४५२ धावा) |
सब्बीर रेहमान (२३६ धावा) |
सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज |
युजवेंद्र चहल (९ विकेट्स) |
अल अमीन होसैन (८ विकेट्स) |
काय: जिंकायलाच पाहिजे असा सामना: भारत विरूद्ध बांग्लादेश, ग्रुप बी, सुपर १२
कधी: बुधवार दिनांक २ नोव्हेंबर २०२२
कुठे: एडलेड ओव्हलच्या अत्यंत सुंदर वातावरणात.
काय पेक्षा आहे: चाहत्यांमध्ये भावनांचा कल्लोळ. भारत- बांग्लादेशचे सामने असेच तर असतात. बॉक्स ऑफिसवर तूफान हिट चालणाऱ्या सिनेमासारखा. अर्थातच, पावसाने काही घोळ नको घालायला.
आता आपण काय करायचे: आपण पाऊस पडू नये म्हणून प्रार्थना करू. नंतर आत्ताच झालेल्या पराभवाची निराशा दूर हटवून भारताच्या विजयासाठी प्रार्थना करू आणि उत्साह वाढवू. लक्षात घ्या, इथे हरले म्हणजे वर्ल्डकपही निसटू शकतो. पण हरकत नाही. आपण आपलं १२ व्या खेळाडूचं काम उत्तम पार पाडायचं.