
आयपीएल सामना ६ | DCvMI ग्राफिकल पूर्वावलोकन: चलो दिल्ली, आमच्या मनात फक्त विजय आहे
विजयाचा मार्ग कधीही सरळ नसतो आणि आपल्या पलटनचा ट्रॅक रेकॉर्ड पाहिला तर त्यांच्यापेक्षा जास्त चांगल्या रितीने दुसरे कोणीही हे सांगू शकणार नाही.
आरसीबीविरूद्ध सामना कठीण गेल्यानंतर मुंबई इंडियन्स आता पुन्हा एकदा सज्ज आहेत आणि दिल्ली कॅपिटल्सविरूद्ध आयपीएल २०२५ च्या सहाव्या सामन्यासाठी तयार होत असताना आम्ही पुन्हा एकदा यशासाठी तेवढेच आतूर आहोत.
आतापर्यंतचा प्रवास खूप आव्हानात्मक होता. कॅम्पमधली भूक अशक्य आहे. एक विजय नावावर आहे आणि आता दुसरा विजय नोंदवलाच पाहिजे. पोरं नेट्स, जिममध्ये प्रॅक्टिस करत आहेत आणि टीममध्ये घमासान चर्चाही सुरू आहेत.
नाबाद असलेल्या डीसीचा सामना करणे ही सोपी गोष्ट नसणार आहे आणि आमच्या संख्यातज्ञांनी वारंवार आकडेमोड करून आपल्या संघासाठी महत्त्वाची आकडेवारी तयार केली आहे. 💻 #DCvMI साठी त्यांनी काय आणले आहे ते पाहूया!
DC vs MI – आयपीएलमध्ये एकास एक आकडेवारी
सामन्यापूर्वी महत्त्वाची माहिती! 💪

**********
आयपीएलमध्ये अरुण जेटली स्टेडियमवर सरासरी धावसंख्या
या ठिकाणी १४ सीझन्सपैकी एकाच सीझनमध्ये दोन्ही इनिंग्समधला सरासरी स्कोअर २००च्या वर गेला आहे आणि हे २०२४ मध्ये घडले आहे.
उद्या आणखी एक जबरदस्त धावा करणारा सामना होईल का? 🤔

**********
स्टार्क विरूद्ध बुमराह - विकेट घेण्याची रेसिपी काय आहे?
डावखुरा 💥 विरूद्ध उजव्या हाताने खेळणारा💥 – मज्जा येणार आहे बघा!

**********
आयपीएलमध्ये अरुण जेटली स्टेडियमवर बाद करण्याच्या पद्धती
फलंदाजांनो, आऊटफिल्ड फील्डर्सपासून सावध राहा बरं का! 👀

**********
जलदगदी विरूद्ध स्पिन - कोणते चेंडू जास्त नुकसान करतील?
काळजी करू नका, ही पाहा आकडेवारी!
• जलदगती गोलंदाजांनी घेतलेल्या विकेट्स

• स्पिनर्सनी घेतलेल्या विकेट्स

**********
बरं मग पलटन, ब्लू अँड गोल्डमधल्या आमच्या पोरांना ही माहिती दिलेली आहे! 🤓 उद्या मैदानात ही माहिती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी ते खूप उत्सुक आहेत.
भेटूया पलटन! 👋 वेळ माहितीय ना तुम्हाला... ⏰ उशीर करू नका...