News

DC vs MI: मुंबई इंडियन्सकडून डीसीचा १२ धावांनी पराभव

By Mumbai Indians

आयपीएल २०२५ च्या सहाव्या सामन्यात आपल्या टीमने रविवारी दिल्ली कॅपिटल्सला १२ धावांनी पराभूत करून जबरदस्त विजय नोंदवला आणि आयपीएलमधल्या दिल्लीच्या सातत्यपूर्ण विजयी प्रवासाला रोखले.

अरुण जेटली स्टेडियमवर खेळवल्या गेलेल्या या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेलने टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दुसरीकडे प्रथम फलंदाजी करताना एमआयने २० ओव्हर्समध्ये ५ विकेट्स देऊन २०५ धावा केल्या.

धावांचा पाठलाग करायला उतरलेला डीसीचा संघ १९ ओव्हर्समध्ये ऑलआऊट झाला. त्यांना फक्त १९३ धावा करता आल्या.

DC vs MI सामन्यात आपल्या टीमला रोहित शर्मा आणि रायल रिकल्टन यांनी चांगली सुरूवात करून दिली. पहिल्या विकेटसाठी या दोघांनी मिळून ४७ धावांची भागीदारी केली. रोहितने २ चौकार, एक षट्काराच्या मदतीने १२ चेंडूंमध्ये १८ धावा केल्या. रायनने सूर्यकुमारसोबत खेळ पुढे नेला आणि महत्त्वाच्या धावा केल्या.

आठव्या ओव्हरमध्ये कुलदीप यादवने रायनच्या रूपाने मुंबईला आणखी एक धक्का दिला.

शानदार कामगिरी करताना रायनने २५ चेंडूत पाच चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ४१ धावा केल्या.

रायननंतर एमआयने सूर्यकुमार यादवची महत्त्वाची विकेट गमावली. सूर्यकुमारने २८ चेंडूत ४० धावा केल्या. त्याने ५ चौकार आणि २ षटकार मारले. नंतर तिलक वर्माने जबाबदारी घेतली आणि मोठे फटके मारून संघाला चांगला स्कोअर करण्यास मदत केली.

तिलकने अर्धशतक फटकावले आणि शेवटच्या ओव्हरमध्ये मुकेश कुमारच्या हातून बाद झाला. त्याने सहा चौकार आणि तीन षट्कारांच्या मदतीने ३३ चेंडूंमध्ये ५९ धावा केल्या.

याशिवाय नमन धीर सिंगने नाबाद खेळी करताना १७ चेंडूत ३८ धावांचे योगदान दिले. त्याने तीन चौकार आणि दोन षटकार मारले. दरम्यान, कर्णधार हार्दिक पांड्याने दोन आणि विल जॅक्सने एक धाव केली. अशा रितीने एमआयने २० ओव्हर्समध्ये ५ विकेट्स गमावून दिल्लीला २०६ धावांचे लक्ष्य दिले.

लक्ष्याचा पाठलाग करताना डीसीची सुरुवात चांगली झाली नाही आणि पहिल्याच षटकात आपला वेगवान गोलंदाज दीपक चहरने मुंबईला पहिला विजय मिळवून दिला. जेक फ्रेझर खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतला.

यानंतर अभिषेक पोरेल आणि करुण नायर यांनी जलद धावा काढल्या. करुणने २२ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. अभिषेकने दुसऱ्या विकेटसाठी ११९ धावांची भागीदारी केली आणि ३३ धावांचे योगदान दिले.

१२ व्या ओव्हरमध्ये मिचेल सँटनरने करुणला पॅव्हेलियनमध्ये पाठवून संघाला मोठे यश मिळवून दिले. करुणने ४० चेंडूंत १२ चौकार आणि ५ षटकारांसह ८९ धावांची शानदार खेळी केली.

करूण बाद झाल्यानंतर दिल्लीचा खेळ डळमळला. अक्षर पटेल (९), ट्रिस्टन स्टब्स (१) आणि केएल राहुल १५ धावा करून बाद झाले.

यानंतर आशुतोष शर्मा आणि विपराज निगम यांनी टीमला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. परंतु ते यशस्वी झाले नाहीत. आशुतोष १७ आणि विपराज १४ धावा करून बाद झाले.

अशा रितीने आपल्या गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी करत दिल्ली कॅपिटल्सला लक्ष्य पूर्ण करू दिले नाही आणि आपली टीम १२ धावांनी विजयी झाली.

मुंबई इंडियन्सचा पुढचा सामना १७ एप्रिल रोजी दिल्ली कॅपिटल्सविरूद्ध असेल.

 

थोडक्यात धावसंख्या

मुंबई इंडियन्स: २० ओव्हर्समध्ये २०५/५; तिलक वर्मा ५९(३३), कुलदीप यादव २/२३

दिल्ली कॅपिटल्स: १९ ओव्हर्समध्ये १९३/१०; करुण नायर, ८९ (४०), कर्ण शर्मा ३/३६