
MI vs RCB: मुंबई इंडियन्सचा आरसीबीविरूद्ध १२ धावांनी पराभव
आयपीएल २०२५ च्या आपल्या पाचव्या सामन्यात आपल्या टीमला घरच्या खेळपट्टीवर म्हणजे वानखेडेवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून १२ धावांनी पराभव पत्करावा लागला. परंतु आपल्या टीमने शेवटच्या ओव्हरपर्यंत जिंकण्याचा पुरेपूर प्रयत्न केला.
सोमवारी खेळवल्या गेलेल्या या सामन्यात मुंबई इंडियन्सने टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आरसीबीने प्रथम गोलंदाजी करत २० ओव्हर्समध्ये ५ विकेट्स देऊन २२१ धावा केल्या.
याला उत्तर देताना आपल्या टीमला २० ओव्हर्समध्ये ९ विकेट्स देऊन फक्त २०९ धावा करता आल्या आणि आपल्याला १२ धावांनी पराभव पत्करावा लागला.
MI vs RCB सामन्यात आरसीबीची सुरुवात फारशी खास नव्हती आणि ट्रेंट बोल्टने मुंबईला पहिले यश मिळवून दिले. पहिल्याच षटकात ट्रेंटने फिल साल्टला (४) बाद केले. यानंतर, विराट कोहली आणि देवदत्त पडिकल यांनी डाव पुढे नेला.
देवदत्तने दुसऱ्या विकेटसाठी ९१ धावा केल्या पण ९व्या ओव्हरमध्ये विघ्नेश पुथूरच्या गोलंदाजीवर विल जॅक्सने त्याला झेलबाद केले. देवदत्तने दोन चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने ३७ धावा केल्या.
यानंतर, रजत पाटीदार विराटला मदत करण्यासाठी क्रीझवर आला आणि दोघांनी संघाला मोठी धावसंख्या गाठण्यास मदत केली, परंतु १५ व्या ओव्हरमध्ये हार्दिक पांड्याने आरसीबीला मोठा धक्का दिला.
कोहलीने सुंदर अर्धशतकी खेळ करत ४२ चेंडूंमध्ये ६७ धावा केल्या आणि त्याने ८ चौकार आणि दोन षट्कार मारले.
याशिवाय रजतने पाच चौकार आणि एक षट्काराच्या मदतीने ३२ चेंडूंमध्ये ६४ धावा केल्या.
त्याचवेळी पांड्याने लियाम लिव्हिंगस्टोनला (०) खाते उघडण्याची संधीही दिली नाही. याशिवाय आरसीबीकडून जितेश शर्माने १९ चेंडूत २ चौकार आणि ४ षटकारांसह ४० धावा काढल्या आणि टिम डेव्हिडने एक धाव घेत नाबाद राहिला.
अशा रितीने आरसीबीने २० ओव्हर्समध्ये २२१/५ ची धावसंख्या उभी केली.
आपल्या टीमच्या गोलंदाजीबाबत बोलायचे झाल्यास ट्रेंट बोल्ट आणि हार्दिक पांड्याने प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. विघ्नेश पुथूरने एक विकेट घेतली.
विजयासाठी २२२ धावांचा पाठलाग करायला उतरलेल्या आपल्या टीमने चांगली सुरूवात केली. रोहित शर्मा आणि रायल रिकेल्टन यांनी टीमसाठी उत्तम धावा सुरू केल्या.
पण मुंबईला रोहित शर्माच्या रूपाने पहिला झटका बसला. तो २ चौकार आणि १ षट्काराच्या मदतीने ९ चेंडूंमध्ये १७ धावा करून बाद झाला.
यानंतर रायनदेखील जास्त वेळ टीमसोबत राहू शकला नाही. तो एलबीडब्ल्यू झाला. त्याने चार चौकारांच्या मदतीने १० चेंडूंमध्ये १७ धावा केल्या.
यानंतर विल जॅक्स आणि सूर्यकुमार यादव यांनी टीमसाठी महत्त्वाच्या धावा केल्या. विलने २ चौकार आणि एक षट्काराच्या मदतीने १८ चेंडूंमध्ये २२ धावा केल्या. सूर्यादाताने २६ चेंडूंमध्ये २८ धावा केल्या. त्यात पाच चौकारही मारले.
यानंतर तिलक वर्मा आणि हार्दिक पांड्या यांनी उत्तम फलंदाजी करत वेगाने धावा केल्या आणि टीमला आपल्या लक्ष्यापर्यंत पोहोचवले. परंतु १८ व्या ओव्हरमध्ये भुवनेश्वर कुमारने तिलकला बाद केले.
तिलकने अप्रतिम अर्धशतकी खेळ केला. त्याने चार चौकार आणि चार षट्कारांच्या मदतीने २९ चेंडूंमध्ये ५६ धावा केल्या.
पांड्याने ही मोठे शॉटस मारून धमाकेदार खेळ केला आणि १५ चेंडूंमध्ये ४२ धावा केल्या. त्यात तीन चौकार आणि चार षट्कार होते. याशिवाय मिशेल सँटनरने ८ आणि नमन धीरने ११ धावा केल्या.
अशा रितीने आपल्या टीमला २० ओव्हर्समध्ये ९ विकेट्स देऊन २०९ च धावा करता आल्या.
मुंबई इंडियन्सचा पुढचा सामना रविवार दिनांक १३ एप्रिल रोजी दिल्ली कॅपिटल्सविरूद्ध असेल.
थोडक्यात धावसंख्या
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू: २० ओव्हर्समध्ये २२१/५; विराट कोहली ६७ (४२), हार्दिक पांड्या २/४५
मुंबई इंडियन्स: २० ओव्हर्समध्ये २०९/९; तिलक वर्मा, ५६ (२९), कृणाल पांड्या ४/४५