
प्रत्येक २०२५ सारख्या सुरूवातीसाठी २०१५ सारखा कमबॅक आहे :D
पलटन, आम्हाला माहीत आहे की आयपीएल २०२५ ची सुरूवात आपल्या मनासारखी झालेली नाही. पाच सामन्यांमध्ये एकच विजय? आम्हाला असे काही होईल असे वाटले नव्हते. परंतु सर्वोत्तम कमबॅक कसा करायचा ते एकाच टीमला माहीत आहे. ती म्हणजे आपली मुंबई इंडियन्स. आता जे म्हणतायत ना “हा सीझन तर गेला हातातून,” त्यांच्यासाठी आमच्याकडे उत्तर आहे— २०१५. 🔥
होय. तो आपला रोलर कोस्टर सीझन आठवतो ना... एमआयने त्याही सीझनमध्ये पहिल्या पाच सामन्यात चार सामने गमावले होते. आठवते आहे ना? आठवलेच पाहिजे. पण त्यानंतर जे घडले तो एक इतिहास होता. 💪
पहिल्या सामन्यांमध्ये चार पराभव पत्करल्यानंतर टीमने आपले प्राण पणाला लावून हरभजन सिंगच्या खास माइलस्टोनच्या टप्प्यानंतर सीझनचा पहिला विजय नावावर नोंदवला- आरसीबीविरूद्ध १८ धावांनी विजय.
100th IPL match + 100th IPL wicket + Man of the match!@harbhajan_singh, tussi great ho! #ApunKaSuperstar #MI pic.twitter.com/cTlgPpyTR7
— Mumbai Indians (@mipaltan) April 19, 2015
मग काय भावांनो... जी टीम पराभवाच्या छायेत होती ती अक्षरशः एखाद्या फिनिक्ससारखी उसळली. तिने एकामागून एक विजय मिळवले आणि अक्षरशः स्टाइलमध्ये दुसरी आयपीएल ट्रॉफी नावावर केली. त्यांनी प्लेऑफ्समध्ये आपले कट्टर प्रतिस्पर्धी चेन्नई सुपर किंग्सचा एकदा आणि नंतर ग्रँड फिनालेमध्ये एकदा दणदणीत पराभव केला. 🎶 या आठवणी जाग्या होतात, हो ना? 🥹
Duniya Hila Denge! Comfortable victory for #ApunKaSuperstar(s)#IPL champions 2015! Like a boss! pic.twitter.com/1zrCTeoXHf
— Mumbai Indians (@mipaltan) May 24, 2015
लेंडील सिमॉन्सच्या पहिल्या क्रमांकावरच्या तोडफोडीपासून ते मलिंगाच्या घोटा फोडणाऱ्या यॉर्कर्सपर्यंत २०१५ या वर्षाने आपल्याला एमआयच्या कथेत कायमस्वरूपी गुंफल्या गेलेल्या आठवणी दिल्या आहेत. पोलार्डने धुमाकूळ घातला होता तेव्हा वानखेडेवर कसा जल्लोष झाला होता ते आठवते का? किंवा भज्जी पाजीच्या महत्त्वाच्या विकेट्स? अशा घटनांनी तर वातावरणच बदलून टाकले होते.
त्या सीझनने आपल्याला काहीतरी महत्त्वाचे शिकवले होते– एमआयला कधीच कमी नाही लेखायचं. 👊
आता आहे २०२५ हे वर्ष आणि आपला विश्वास तसाच आहे. 🙌 आपली टीम सज्ज आहे. विजयाची भूक जोरदार आहे आणि पोरं प्रचंड मेहनत करतच आहेत. याला फक्त एकच स्पार्क आवश्यक आहे. ड्रेसिंग रूम दुःखी नाहीये. ती मैदानात काहीही झालं तरी आपल्या रक्ताचे पाणी करून पूर्ण प्रयत्न करण्यासाठी सज्ज आहे.
पलटनचा विश्वास आहे. आपल्या #OneFamily चा विश्वास आहे. आपण हे यापूर्वी केले आहे आणि आता परत कसे करायचे हे नक्कीच माहीत आहे. म्हणतात नाह, फॉर्म तात्पुरता असतो. पण बसलेले धक्के लढाईत रूपातंरित करायचे? तो आपला दैदिप्यमान इतिहास आहे. 💙