News

आयपीएल लिलाव २०२३ एफएक्यूः वेळ झाली चला!

By Mumbai Indians

आता ती वेळ पुन्हा आलीय. येस्स! संघ, अंदाज आणि अज्ञाताबाबत उत्सुकता. इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)चा १६ व्या सीझनसाठीचा मिनी लिलाव येत्या शुक्रवारी (२३ डिसेंबर २०२२) रोजी होणार आहे.

कर्णधारांना मुक्त केले आहे, महत्त्वाचे खेळाडू राखून ठेवले आहेत, देवाणघेवाण आणि खूप सारी एक्शन आधीच झाली आहे. सर्व फ्रँचायझींनी आगामी सीझनसाठी आपापली रणनीती आखली आहे. आयपीएल २०२३ मध्ये लीगचा टप्पा घरच्या आणि दूरच्या खेळपट्टीवर खेळला जाईल. या सीझनमध्ये ७४ लीग सामने होतील. ते २०२२ च्या पद्धतीनेच खेळले जातील आणि त्यानंतर प्लेऑफ्स होतील.

आपल्याबाबत सांगायचे झाल्यास आपण २०२२ च्या बॅचमधील १५ खेळाडू कायम ठेवले आहेत आणि लिलावपूर्वी झालेल्या व्यापारात जेसन बेरेन्डॉफला खरेदी केले आहे. त्यामुळे आपल्याकडे आता नऊ खेळाडूंसाठी जागा आहे (सहा भारतीय, तीन परदेशी.) 

चला तर मग पलटन, या मजेदार छोट्या लिलावापूर्वी तुम्हाला ज्या गोष्टी जाणून घेणे गरजेच्या आहेत त्या जाणून घेऊया- नियम, बजेट, स्लॉट्स आणि आवश्यकता.

काय: आयपीएल २०२३ लिलाव

कधी: २३ डिसेंबर २०२२

कुठे: कोची

काय अपेक्षा आहे: भरपूर बोलीयुद्ध, काही चुका, काही खेळाडूंची घरवापसी, काही नवीन खेळाडूंचा समावेश, काही आश्चर्यकारक बाबी, काहींना सोडून द्यावे लागेल, काही नवीन तडफदार चेहरे आणि मनोरंजन तर आहेच.

स्लॉट आणि शिल्लक असलेले बजेट:

संघ

राखलेले भारतीय खेळाडू

राखलेले परदेशी खेळाडू

शिल्लक बजेट

उपलब्ध जागा

परदेशी शिल्लक जागा

मुंबई इंडियन्स

११

२०.५५ कोटी रूपये

चेन्नई सुपर किंग्स

१२

२०.४५ कोटी रूपये

दिल्ली कॅपिटल्स

१४

१९.४५ कोटी रूपये

गुजरात टायटन्स

१३

१९.२५ कोटी रूपये

कोलकाता नाइट रायडर्स

७.०५ कोटी रूपये

११

लखनौ सुपर जायंट्स

११

२३.२५ कोटी रूपये

१०

पंजाब किंग्स

११

३२.२० कोटी रूपये

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू

१२

८.७५ कोटी रूपये

राजस्थान रॉयल्स

१२

१३.२ कोटी रूपये

सनरायझर्स हैदराबाद

४२.२५ कोटी रूपये

१३

नियम आणि इतर बाबी:

आपण आपल्या आयुष्यात अनेक नियमांचे पालन करतो. तसेच आयपीएलच्या लिलावाचेही काही विशिष्ट नियम आपल्याला पाळावे लागतात. काही फ्रँचायझींनी आपल्या टीम्स पूर्ण बदलायचे ठरवले आहे आणि काही फ्रँचायझींना फक्त सजावटीची गरज आहे. आपण यांच्या मध्ये कुठेतरी आहोत. तर बघा काय नियम आहेत ते: 

  • मागील वर्षीच्या शिल्लक रकमेतील पाच कोटी रूपये या फ्रँचायझींकडे अतिरिक्त असतील आणि मुक्त केलेल्या खेळाडूंचे मूल्य असेल.
  • फ्रँचायझींना आपल्याकडील एकूण रकमेच्या ७५ टक्के रक्कम खर्च करावी लागेल.
  • पूर्वी राइट टू मॅच (आरटीएम) कार्ड उपलब्ध होते. त्यामुळे फ्रँचायझींना आपल्या काही हिरोजना पुन्हा आणता येत होते. ते यावेळी उपलब्ध नाही.
  • संघांकडे २०२३ साठी १७ ते २५ भारतीय खेळाडू आणि जास्तीत जास्त ८ परदेशी खेळाडू असावे लागतील.
  • एखादा खेळाडू विकला न गेल्यास त्याला फ्रँचायझींच्या मागणीवरून नंतरच्या टप्प्यांमधील छोट्या लिलावांमध्ये पुन्हा आणता येईल.

महत्त्वाची गोष्ट: रणनीतीनुसार खेळाडूंची निवड

बीसीसीआयने २०२३ मध्ये रणनीतीनुसार बदली खेळाडू खेळवता येतील असे सूचित केले आहे. त्यामुळे प्रत्येक टीममध्ये १२ खेळाडूंचा समावेश असेल आणि त्यामुळे त्यांना त्यांचे पैसे विशिष्ट जबाबदारी निभावणाऱ्य़ा खेळाडूंवर खर्च करावे लागतील.

मजा आहे ना? रोहित शर्मा, मार्क बाऊचर आणि इतर सर्व मुत्सद्दी आता आपल्या रणनीतीसाठी सज्ज झाले आहेत आणि २३ डिसेंबरची सकाळ उगवेल तेव्हा आपल्याला लिलावाच्या सभागृहात युद्ध पाहायला मिळेल. रोलरकोस्टर राइडसाठी तयार व्हा, पलटन.