News

MI Junior 2025: शारदाश्रम विद्यामंदिरचे विजयी सातत्य कायम

By Mumbai Indians

दादर येथील शारदाश्रम विद्यामंदिरने सांघिक कामगिरीमध्ये कमालीचे सातत्य राखताना एमआय ज्युनियर आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेच्या 15 वर्षांखालील मुली गटाच्या साखळी सामन्यात मंगळवारी चत्रभुज नरसी मेमोरियल स्कूलवर 364 धावांनी विजय मिळवला.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना स्वरदा बेंडे (नाबाद 105) आणि वैदई तानावडेने (नाबाद 102) तुफानी फटकेबाजी करताना शारदाश्रम विद्यामंदिरला 16 षटकांत बिनबाद 425 धावांची मजल मारून दिली. त्यात पेनल्टी धावांचाही समावेश आहे. प्रत्युतरादाखल, चत्रभुज नरसी मेमोरियल स्कूलचा डाव 17.5 षटकांत 61 धावांत आटोपला. भार्गवी पाटीलने 4 आणि ध्वनीने 3 विकेट घेत प्रतिस्पर्ध्यांना हादरवले.

संक्षिप्त धालफलक:

14 वर्षांखालील मुले:

• चेंबूर कर्नाटक हायस्कूल अँड कॉलेज - 38.4 षटकांत 5 बाद 214 (अंकित म्हात्रे 63, ओंकार कोळी 55, श्रेयश गोवारी 42; अक्षत जोशी 2/33) विजयी वि. जनरल एज्युकेशन अकॅडमी (चेंबूर) - 40 षटकांत 7 बाद 213 (शार्दुल फगरे 88, यशराज काळसकर 41, अर्णव पाटील 37; विराज पाटील 2/36).

15 वर्षांखालील मुली:

• सेंट कोलंबा स्कूल (गावदेवी) - 4.3 षटकांत बिनबाद 44 (मैथिली सकपाळ 19) विजयी वि. सेंट मेरीज हायस्कूल (मुलुंड) - 10.2 षटकांत सर्वबाद 43 (दुर्वा पालव 3/4, शालन मुल्ला 2/10).

• शारदाश्रम विद्यामंदिर (दादर) - 16 षटकांत बिनबाद 425 (स्वरदा बेंडे नाबाद 105, वैदई तानावडे नाबाद 102) विजयी वि. चत्रभुज नरसी मेमोरियल स्कूल -17.5 षटकांत सर्वबाद 61 (भार्गवी पाटील 4/10, ध्वनी2/13).