एमआय ज्युनियर आंतरशालेय क्रिकेट स्पर्धाः आदित्य, सिद्धार्थ, उमर आणि इतरांची चमकदार कामगिरी
सध्या सुरू असलेल्या एमआय ज्युनियर आंतर शालेय क्रिकेट स्पर्धेत आदित्य हरयाण, सिद्धार्थ गुप्ता, उमर खुटे आणि इतरांनी गुरूवारी आपापल्या टीम्ससाठी अप्रतिम कामगिरी केली.
मुंबईतील एमआय ज्युनियर १४ वर्षांखालील मुलांच्या सामन्यात मध्यम जलदगती गोलंदाज आदित्य हरयाणने रायन इंटरनॅशनल स्कूलचा (चेंबूर) तब्बल ८ विकेट्स घेऊन धुव्वा उडवला आणि सेंट मेरीज हायस्कूल एसएससी (माझगाव)ला २१९ धावांनी दणदणीत विजय मिळवायला मदत केली.
आधी फलंदाजीला उतरलेल्या सेंटर मेरीजने ४० ओव्हर्समध्ये २६६ धावा केल्या. अद्वैत रहाटे (११६ चेंडूंमध्ये ११६ धावा) आणि वंश पडेलकर (१०८ चेंडूंमध्ये नाबाद १०० धावा) यांनी प्रत्येकी शतक झळकवले. प्रत्युत्तरासाठी खेळायला उतरलेला रायन इंटरनॅशनलचा संघ आदित्यच्या सुंदर खेळामुळे फक्त ४७ धावांमध्ये सर्वबाद झाला.
आणखी एका १४ वर्षे वयाखालील मुलांच्या सामन्यात सिद्धार्थ गुप्ताच्या १०१० चेंडूंमधील १७७ धावांच्या खेळामुळे रायन इंटरनॅशनल स्कूल (नालासोपाराःला सेंट एन कॉन्व्हेंट स्कूल (वसई)विरूद्ध २२९ धावांनी विजय मिळवता आला.
सिद्धार्थने सेंट एनच्या गोलंदाजांना मैदानाच्या कानाकोपऱ्यात भिरकावून दिले. त्यामुळे रायन इंटरनॅशनलला ४० ओव्हर्समध्ये एकूण ३२६ धावा करता आल्या. उमर खुटेने त्यानंतर रायन इंटरनॅशनलसाठी अप्रतिम गोलंदाजी केली. त्याने फक्त १७ धावांमध्ये ५ विकेट्स घेतल्या आणि सेंट एनला ९७ धावांमध्ये सर्वबाद केले.
१६ वर्षे वयाखालील मुलांच्या वर्गवारीत श्रीमती सुलोचनादेवी सिंघानिया स्कूलचा अमेय मोरे आजच्या दिवसाचा स्टार ठरला. त्याने १३४ धावा करून आपल्या संघाच्या ४३१ धावसंख्येत मोलाची भर घातली. प्रतिस्पर्धी अमूलख अमिचंद इंटरनॅशनल स्कूलचा संघ (माटुंगा) फक्त ७४ धावांमध्ये बाद झाला.
१४ वर्षे वयाखालील मुलांच्या सामन्यात रिझवी स्प्रिंगफिल्ड हायस्कूल (खार)ने आयुध मोहंती (२-३) आणि आरव श्रीवास्तवच्या (२-१२) च्या अप्रतिम गोलंदाजीमुळे सरदार वल्लभभाई पटेल हायस्कूल (मिरा रोड)ला फक्त ६७ धावांमध्ये बाद केले आणि नंतर ८ विकेट्स हातात ठेवून अगदी सहजपणे लक्ष्य पूर्ण केले. पुगझ सुंदरराजने नाबाद ४३ धावा केल्या.
आणखी एका १४ वर्षांखालील मुलांच्या सामन्यात बॉम्बे स्कॉटिशने छत्रभुज नरसी मेमोरियल स्कूलचा ११२ धावांवर सर्वबाद करून आठ विकेट्सनी पराभव केला. विहान शेठने ३-२४ असा अप्रतिम खेळ केला. कुशाग्र चावला (४७*) आणि विहान शेठ (२४*) हे खेळाडू धावांच्या पाठलागात बॉम्बे स्कॉटिशसाठी सर्वाधिक धावा करणारे ठरले.
याच श्रेणीतल्या आणखी एका सामन्यात पवार पब्लिक स्कूल, भांडुपने सेंट एलॉयसियस हायस्कूल (नालासोपारा)विरूद्ध वॉकओव्हरने विजय प्राप्त केला.
दुसरीकडे १६ वर्षांखालील मुलांच्या सामन्यात आरआर एज्युकेशन ट्रस्ट (मुलुंड)च्या विकास सिंग (४-२९) आणि अंकित चव्हाणच्या महत्त्वाच्या अर्धशतकामुळे (५०*) त्यांना अंजुमन इस्लाम इंग्लिश स्कूल वाशीविरूद्ध आठ विकेट्सनी विजय मिळवता आला.
आणखी एका १६ वर्षांखालील मुलांच्या सामन्यात सिद्धी शेट्टी (६७*) आणि हार्दिक शिरूडे (३-२४) यांनी पोद्दार इंटरनॅशनल स्कूल, पवई सीबीएसईला केंद्रिय विद्यालय आयआयटी (पवई)विरूद्ध १० विकेट्सनी विजय मिळवून दिला. हा संघ ११५ धावांवर सर्वबाद झाला.
१४ वर्षे वयाखालील मुलांच्या सामन्यात अमोल घोरपडेच्या अप्रतिम गोलंदाजीमुळे (४-१०) माटुंगा प्रीमियर स्कूलला धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलविरूद्ध ७ विकेटनी विजय मिळवणे शक्य झाले. हा संघ फक्त ६४ धावांवर बाद झाला.
आणखी एका १४ वर्षांखालील मुलांच्या सामन्यात रेहान मुलाणीच्या अप्रतिम पाच विकेट्सनी (५-२५) आयईएस व्हीएन सुळे इंग्लिश स्कूल, दादरला युरो स्कूल ऐरोलीचा १० विकेट्सनी धुव्वा उडवणे शक्य झाले.
दुसऱ्या एका १४ वर्षांखालील मुलांच्या सामन्यात व्हीपीएमएस विद्यामंदिरच्या जश नायकने ५-२ अशी सुंदर खेळी केली. त्यामुळे त्यांना फक्त १७ धावांमध्ये सिस्टर निवेदिता हायस्कूलच्या संघाला बाद करून नऊ विकेट्सनी विजय मिळवता आला. दुसरीकडे याच वर्गातील आणखी एका सामन्यात आरबीके मिरा रोडच्या दक्ष गोटीच्या अष्टपैलू खेळामुळे (८५ धावा आणि ३-१) त्यांना विद्या विकासिनी आयसीएसई स्कूलविरूद्ध १५८ धावांनी विजय मिळवता आला.
हर्षवर्धन बारमुख (१२०), अनिश तांबे (३-३) आणि अर्जुन तिवारी (३-४) यांच्या अप्रतिम कामगिरीमुळे आयईएस न्यू इंग्लिश स्कूल, वांद्रेने १४ वर्षांखालील मुलांच्या सामन्यात एन. एल. दालमिया हायस्कूल, मिरा रोडचा ४३९ धावांनी पराभव केला.
आणखी एका १४ वर्षांखालील मुलांच्या सामन्यात युवराज चंद्रूच्या अष्टपैलू खेळामुळे (३-१३ आणि ४४) रायन इंटरनॅशनल स्कूल (खारघर)ला सेंट मेरीज आयसीएसई, माझगावविरूद्ध तीन विकेट्सनी विजय मिळवता आला.
साने गुरूजी इंग्लिश मीडियम स्कूल, दादरच्या स्वप्निक वाघधरेचे सुंदर शतक (११०) आणि स्वप्नील गोल्लरची (३-१०) आणि आर्यन कदम (३-१२) यांच्या अप्रतिम गोलंदाजीमुळे त्यांच्या संघाला जेव्ही पारेख इंटरनॅशनल स्कूल (विलेपार्ले)चा २०५ धावांनी पराभव करणे शक्य झाले.
थोडक्यात धावसंख्या:
१४ वर्षांखालील मुले
सरदार वल्लभभाई पटेल हायस्कूल (मिरा रोड) १४.४ ओव्हर्समध्ये ६७ धावा सर्वबाद (आयुध मोहंती २-३, आरव श्रीवास्तव २-१२)चा रिझवी स्प्रिंगफील्ड हायस्कूल (खार)कडून ९ ओव्हर्समध्ये ७०/२ धावा करून पराभव (पुगझ सुंदरराज ४३*).
सामनावीर – आरव श्रीवास्तव
छत्रभुज नरसी मेमोरियल स्कूल (विलेपार्ले) २८ ओव्हर्समध्ये ११२ धावांवर सर्वबाद (निर्वाण शाह ६६; विहान शेठ ३-२४) चा बॉम्बे स्कॉटिश, माहीमकडून १८ ओव्हर्समध्ये ११५/२ धावा करून पराभव (कुशाग्र चावला ४७*, विहान शेठ २४*).
सामनावीर- विहान शेठ
धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल २०.३ ओव्हर्समध्ये ६४ धावांवर सर्वबाद (घोरपडे अमोल ४-१०) चा माटुंगा प्रीमियर स्कूलकडून ८.५ ओव्हर्समध्ये ६५/३ धावा करून पराभव (संदीप घोडके २८*).
सामनावीर- घोरपडे अमोल
युरो स्कूल ऐरोली १४.२ ओव्हर्समध्ये ५८/९ (रेहान मुलानी ५-२५) चा आयईएस व्हीएन सुळे इंग्लिश स्कूल दादर कडून ६.५ ओव्हर्समध्ये ५९/० धावा करून पराभव. (वेद तेंडुलकर ४०*).
सामनावीर- रेहान मुलानी
सिस्टर निवेदिता हायस्कूल १४.१ ओव्हर्समध्ये १७ धावांवर सर्वबाद (जश नायक ५-२) चा व्हीपीएमएस विद्यामंदिर दहिसर पूर्वकडून ३.१ ओव्हर्समध्ये १८/१ धावांवर पराभव.
सामनावीर- जश नायक
पवार पब्लिक स्कूल भांडुपचा सेंट अलॉयसियस हायस्कूल (नालासोपारा)विरूद्ध वॉकओव्हरने विजय.
आरबीके मिरा रोड ३६.१ ओव्हर्समध्ये २३२ धावांवर सर्वबाद (दक्ष गोटी ८५; शुभ शर्मा ४-३९) कडून विद्या विकासिनी आयसीएसई स्कूलचा १२.२ ओव्हर्समध्ये ५४ धावांवर सर्वबाद करून पराभव (दक्ष गोटी ३-१).
सामनावीर – दक्ष गोटी
सेंट मेरीज हायस्कूल एसएससी (माझगाव) ४० ओव्हर्समध्ये २६६/२ (अद्वैत रहाटे ११६, वंश पडेलकर १००*) कडून रायन इंटरनॅशनल स्कूल (चेंबूर)चा १०.३ ओव्हर्समध्ये ४७ वर सर्वबाद करून पराभव. (आदित्य हरयाण ८-५).
सामनावीर- आदित्य हरयाण
रायन इंटरनॅशनल स्कूल (नालासोपारा) ४० ओव्हर्समध्ये ३२६/९ (सिद्धार्थ गुप्ता १७७; साई खामकर ३-५४) कडून सेंट एन्स कॉन्व्हेंट स्कूल (वसई)चा २६.२ ओव्हर्समध्ये ९७/९ धावांवर पराभव. (उमर खुटे ५-१२).
सामनावीर- सिद्धार्थ गुप्ता.
आयईएस न्यू इंग्लिश स्कूल, वांद्रे ३३ ओव्हर्समध्ये ४६७/६ (हर्षवर्धन बारमुख १२०; अक्षत रंजन २-२७) (१५४ पेनल्टी धावांसह) कडून एन. एल. दालमिया हायस्कूल, मिरा रोडचा १५.३ ओव्हर्समध्ये २८ धावांवर सर्वबाद करून पराभव (अनिश तांबे ३-३, अर्जुन तिवारी ३-४)
सामनावीर- हर्षवर्धन बारमुख
सेंट मेरीज आयसीएसई माझगाव ३०.३ ओव्हर्समध्ये १२१ सर्वबाद (कल्याण शाह ३३, युवराज चंद्रूस ३-१३, मयंक पाटील ३-२०) चा रायन इंटरनॅशनल स्कूल (खारघर)कडून २०.४ ओव्हर्समध्ये १२३/७ धावांवर पराभव. (युवराज चंद्रूस ४४; ऋषिकेश आंबेकर ३-१६) .
सामनावीर- युवराज चंद्रूस
सानेगुरूजी इंग्लिश मीडियम स्कूल दादर ४० ओव्हर्समध्ये २८७/८ (स्वप्नीक वाघधरे ११०; ताथ्या पटेल २-४१) कडून जेव्ही पारेख इंटरनॅशनल स्कूल, (विलेपार्ले)चा २७.१ ओव्हर्समध्ये ८२ धावांवर सर्वबाद करून पराभव. (विवान जोगानी; स्वप्नील गोल्लर ३-१०, आर्यन कदम ३-१२)
सामनावीर- स्वप्नीक वाघधरे
१६ वर्षांखालील मुले
अंजुमन इस्लाम इंग्लिश स्कूल, वाशी २८.५ ओव्हर्समध्ये ९४ धावांवर सर्व बाद (शाहीद शेख २९; विकास सिंग ४-२९) चा आरआर एज्युकेशन ट्रस्ट (मुलुंड)कडून १४.५ ओव्हर्समध्ये ९५/२वर पराभव (अंकित चव्हाण ५०*).
सामनावीर- विकास सिंग
केंद्रीय विद्यालय आयआयटी (पवई) २४.३ ओव्हर्समध्ये ११५ धावा सर्व बाद (प्रवर राय २९; हार्दिक शिरूडे ३-२४) चा पोद्दार इंटरनॅशनल स्कूल, पवई सीबीएसईकडून ८.३ ओव्हर्समध्ये ११६/० वर पराभव (सिद्धी शेट्टी ६७*).
सामनावीर – हार्दिक शिरूडे
आयईएस हायस्कूल (नवी मुंबई)चा यशोधाम हायस्कूल (गोरेगाव)विरूद्ध वॉकओव्हरने विजय.
श्रीमती सुलोचनादेवी सिंघानिया स्कूल ३८ ओव्हर्समध्ये ४३१/८ धावा (अमेय मोरे १३४; आरव ओझा ३-७२) कडून अमूलख अमिचंद इंटरनॅशनल स्कूल (माटुंगा)चा १७.५ ओव्हर्समध्ये ७४ धावांवर पराभव (देवांश शिंदे ३-१०)
सामनावीर- अमेय मोरे.